अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या एअरलिफ्ट (Airlift) सिनेमातील अभिनेता पूरब कोहली (Poorab Kohli) याने इंस्टाग्राम वर पोस्ट करून आपल्या फॅन्सना एक धक्कादायक बातमी दिली आहे. पूरब ने आपल्या कुटुंबासहित आपल्याला सुद्धा कोरोनाची लागण (Coronavirus) झाली होती असे आपल्या पोस्ट मध्ये सांगितले आहे. पूरब आपल्या कुटुंबासोबत सध्या लंडन मध्ये वास्तव्यास आहे. मागील दोन आठवड्यांपूर्वी पूरब, त्याच्या दोन मुली आणि पत्नी अशा सर्वांना साधारण तापाची लक्षणे दिसून आली होती त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते, त्यानंतर कोरोनाची चाचणी करताच या चौघांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यांनतर योग्य ते उपचार घेऊन आता त्यांनी कोरोनावर मात केली आहे, मागच्या गुरुवारी त्यांचा क्वारंटाईन कालावधी सुद्धा संपला. यानंतर याबाबत त्याने इंस्टाग्राम वरून संपूर्ण परिस्थितीचा अनुभव शेअर केला आहे. Coronavirus: गायिका कनिका कपूर हिला डिस्चार्ज, अखेर सहावी कोरोना व्हायरस चाचणी आली निगेटीव्ह
पूरब ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की , 'सर्वातआधी आपली मुलगी इनायाला करोनाची लागण झाली. सुरुवातीला तिला थोडासा खोकला आणि सर्दी होती. दोन दिवसांनंतर पत्नीलाही छातीत दुखू लागले. पत्नीनंतर मलाही खूप जास्त सर्दी झाली. सर्दी खरतर एकाच दिवसात ठीक झाली पण यानंतर मला खोकला होऊ लागला.तीन दिवस हाच प्रकार सुरु होता यावेळी मी आणि पत्नी आमच्या दोघांच्या शरीराचं तापमान 100-101 इतके जास्त होते. तर मुलीला सुद्धा तीन दिवस 104 इतका ताप होता. नाक वाहत होता खोकला येत होता पाचव्या दिवशी तिचा ताप उतरला, यावेळी आम्हा सर्वाना विलगीकरणात राहण्यास सांगितले गेले होते, अशातच कोरोनाची चाचणी सुद्धा करण्यात आली, दुर्दैवाने कोरोना पॉझिटिव्ह असल्याचेसमजले , मात्र आम्ही त्यावर न चुकता उपचार करून आता कोरोनावर मात केली आहे. आता संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे".
Poorab Kohli Instagram Post
दरम्यान,पूरब ने यासोबतच या काळत कोणते घरगुती उपाय केले आणि कशाप्रकारे काळजी घेतली हेही सांगितले.'दिवसातून चार ते पाच वेळा आम्ही गरम पाण्याच्या गुळण्या करायचो. आलं, हळद आणि मध खाण्यामुळेही फार आराम मिळाला. याशिवाय पाण्याची बाटली आम्ही डोक्यावर ठेवायचो. यामुळे थोडं बरं वाटायचं. याशिवाय गरम पाण्याने आंघोळ करण्याचाही आम्हाला फायदा झाला" असे सांगताना पूरब ने सर्वांना कृपया घरी रहा आणि शरीराला आराम द्या.असे आवाहनही केले आहे.