Adipurush चित्रपटावर भाजप आमदार राम कदम यांचा आक्षेप, रामायणातील तथ्यांसोबत छेडछाड केल्याचे सांगत सैफ अली खान ला दिला इशारा
BJP MLA Ram Kadam | (Photo Credits: ANI)

बॉलिवूड चित्रपटांमधील ऐतिहासिक घटना आणि त्यामधील व्यक्तीच्या संदर्भात छेडछाड केल्यासंदर्भात वाद निर्माण झाल्याचे प्रकार याआधी घडले आहेत. त्यानंतर आता अभिनेता सैफ अली खान  (Saif Ali Khan) याचा आगामी चित्रपट आदिपुरुष (Adipurush) यामध्ये त्याने रावणाची भुमिका साकारताना दिसून येणार आहे. एका मुलाखती दरम्यान जेव्हा सैफ याने असे म्हटले होते की, रावणाच्या भुमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.(Adipurush: सैफ अली खान याचा चित्रपट 'आदिपुरुष' प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात; कारण घ्या जाणून)

भाजप प्रवक्ते आणि आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी असे म्हटले आहे की, अभिनेता सैफ अली खान हा आदिपुरुष चित्रपटातून रावणाची भुमिका साकारणार आहे. तो ही भुमिका एका हिरोसारखीच करण्याचा प्रयत्न करेल. रावणाच्या कृत्याला चित्रपटातून न्याय देईल. हे कसे शक्य आहे? राम आणि रावण यांच्यातील लढाई, श्री राम धर्माची स्थापना ही धर्म आणि अनीतीची लढाई आहे. चित्रपट निर्माते हिंदू श्रद्धा मानून चित्रपट बनवावा.

राम कदम यांनी वृत्तपत्रात छापलेल्या लेखानुसार सैफ अली खान आदिपुरुष नावाच्या एका चित्रपटात झळकणार आहे. ज्यामध्ये रावण दयाळू आणि मावतावादी असल्याचे सैफने एका मुलाखतीत बोलले होते. त्यामुळे जर अशा पद्धतीची चित्रपटाची संकल्पना असल्यास सैफ याच्यासह चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखकांनी रिसर्च करण्यानंतर हिंदू समाजाला विश्वासात घेऊन काम करावे. भगवान श्रीराम, माता सीता आणि हिंदुंच्या भावनेसंबंधित विषयांवर चित्रपट बनवताना त्याच्या तथ्यांसोबत छेडछाड करु नये. जर कोणतेही तथ्यासह छेडछाड करुन हिंदू धर्माचा अपमान, हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काम केल्यास हिंदू समाज त्यांना माफ करणार नाही.(Bhoot Police: अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर 'भूत पोलिस' या चित्रपटातून पहिल्यांदाच दिसणार एकत्र; या वर्षाअखेरीस शूटिंगला होणार सुरुवात)

 दरम्यान, सैफ अली खान याचा आगामी चित्रपट आदिपुरुषची शूटिंग अद्याप सुरु झालेली नाही. हा चित्रपट 2021 पर्यंत लॉन्च केला जाणार आहे. तर माता सीता आणि लक्ष्मणच्या भुमिकेत कोण दिसून येणार याबद्दल अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.