Bhoot Police: अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर 'भूत पोलिस' या चित्रपटातून पहिल्यांदाच दिसणार एकत्र; या वर्षाअखेरीस शूटिंगला होणार सुरुवात
Bhoot Police (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसला. तर अनेक चित्रपटांचे शूटिंग, प्रदर्शन लांबणीवर पडले. मात्र आता सरकारने दिलेल्या नवीन नियमावलीच्या आधारावर पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात झाली आहे. याच धर्तीवर निर्माते रमेश तोरानी यांनी आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. 'भूत पोलिस' (Bhoot Police) असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटातून सैफ अली खान (Saif Ali Khan)आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील. हा चित्रपट एक भयपट-विनोदी असा चित्रपट असेल.

पवन किर्पलानी (Pavan Kirpalani) हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या शेवटी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. Sadak 2: आलिया भट्ट-संजय दत्त चा चित्रपट 'सडक 2' ठरला IMDB चे सर्वात कमी रेटिंग मिळालेला सिनेमा

चित्रपट समीक्षक तरण आदर्श याने या बाबत ट्विटरच्या माध्यमातून माहित देत सैफ अली खान आणि अर्जुन कपूर पहिल्यांदा एकत्र दिसणार असल्याचे सांगितले आहे.

सैफ आणि अर्जुन ही जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. तसेच अर्जुन आणि सैफ अली खान यांनी या आधी विनोदी भूमिका केल्या आहेत. मात्र या चित्रपटातून ते काय नवीन धमाल करतील ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेल.