अभिनेत्री नुशरत भरुचा हिचा ‘छोटे छोटे पेग मार' गाण्यातील बोल्ड लूक पाहून वडिलांनी तिला प्रश्न विचारला 'तू फक्त अंतर्वस्त्र घातले आहेस का?’
Nushrat Bharucha (PC - Instagram)

बॉलिवुड अभिनेत्री नुशरत भरुचा (Nushrat Bharucha) चे ‘सोनू की टीटू की स्वीटी’ या चित्रपटातील ‘छोटे छोटे पेग मार' (Chote Chote Peg Mar Song) हे गाणं प्रचंड गाजलं होतं. या गाण्यात नुशरतच्या बोल्ड लूकची प्रचंड चर्चा झाली होती. हे गाणं पाहिल्यानंतर नुशरतच्या वडिलांनी तिला पेचात पाडणारा प्रश्न विचारला होता. 'तू फक्त अंतर्वस्त्र घातले आहेस का?’ असा प्रश्न नुशरतच्या वडिलांनी तिला विचारला होता. हा प्रश्न ऐकूण नुशरत चांगलीचं पेचात पडली होती.

नुशरतने ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला हे गाणं पाहिल्यानंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने वडिलांची गाणं पाहिल्यांनंतर काय प्रतिक्रिया होती, याविषयीचा अनुभव सांगितला. (हेही वाचा - रितेश देशमुख घरातील आरसा पुसत असताना स्वत:चा लूक पाहून म्हणाला 'मैं हूं खलनायक', पाहा मजेशीर टिकटॉक व्हिडिओ)

नुशरत भरुचा चा ‘छोटे छोटे पेग मार’ या गाण्यातील बोल्ड लुक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. या गाण्यात नुशरतने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. नुशरतच्या वडिलांनी जेव्हा हे गाणं पाहिलं तेव्हा त्यांनी तिला ‘तू फक्त अंतर्वस्त्र घातले आहेस का?’ असा प्रश्न विचारला होता.

दरम्यान, नुशरतने ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘छोटे छोटे पेग मार’ या गाण्याविषयी मी कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सांगितलं नव्हतं. माझं हे गाणं पाहून त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय असणार याविषयी मला अंदाज लावता येत नव्हता. परंतु, मी चित्रपटाचं प्रमोशन करुन घरी आले तेव्हा आई-बाबा माझं हे गाणं पाहत होते. त्यावेळी बाबांनी मला माझ्या रुममध्ये येऊन 'तू फक्त अंतर्वस्त्र घातले होतेस का?' असा प्रश्न विचारला. बाबांचा हा प्रश्न ऐकून मी पेचात पडले आणि मी त्यांना उत्तर देणं टाळलं, असंही नुशरतने यावेळी सांगितलं.