मुलगा Bobby Vij ला काम मिळत नसल्याने अभिनेत्री Kishori Shahane चिंतेत; म्हणाली, 'अरे एखादी संधी देऊन तरी बघा'
किशोरी शहाणे व बॉबी वीज (संग्रहित संपादित प्रतिमा)

अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) या जवळजवळ 30-35 वर्षांपासून मराठी-हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. यासोबतच त्या शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना आणि चित्रपट निर्मात्यादेखील आहेत. सध्या त्या ‘गुम है किसी के प्यार में’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहेत. सध्या किशोरी शहाणे या एका नव्या चिंतेत आहेत. किशोरी शहाणे यांचा मुलगा बॉबी विज (Bobby Vij) याला चित्रपटांमध्ये करिअर करायचे आहे, पण अडचण अशी आहे की, त्याला कोणीही ब्रेक देत नाहीये.

मुलाला काम मिळत नसल्याने व्यथित झालेल्या किशोरी शहाणे म्हणतात, आपला मुलगा लहानपणापासूनच थिएटर करत आहे आणि बॉबीला एका ओळख मिळायला हवी. बॉबीला चित्रपटांमध्ये ब्रेक द्यायला हवा. किशोरी शहाणे आपल्या कारकिर्दीबाबत खूश आहेत, पण त्यांची एक तक्रार आहे ती म्हणजे आजचे प्रसिद्ध सेलिब्रिटी नवीन टॅलेंटला संधी देत ​​नाहीत. रोनित रॉय, बाबा सहगल आणि अली असगर यांची नावे घेत किशोरी शहाणे म्हणाल्या, 'पूर्वी माझे पती (चित्रपट दिग्दर्शक) दीपक बलराज यांनी अनेक नवोदितांना ब्रेक दिला. यामध्ये कलाकारांसह गायकांचाही सहभाग होता. आम्ही लोकांना व्यासपीठ दिले. पण आता बॉलीवूडमध्ये करिअर करणे खूप कठीण झाले आहे. (हेही वाचा: Baahubali 3: प्रभास आणि राजामौली पुन्हा 'बाहुबली 3'च्या तयारीत! अभिनेता म्हणाला, 'बाहुबलीचा पुढचा भाग लवकरचं येऊ शकतो')

View this post on Instagram

A post shared by Bobby Vij (@bobbyvij17)

25 वर्षीय बॉबी विज चित्रपटांमध्ये नशीब आजमावत आहे. बॉबी ब्रेकसाठी पात्र आहे. त्यामुळे त्याला ओळखून एका चांगला ब्रेक दिला पाहिजे, असे किशोरी शहाणे म्हणतात. त्या पुढे म्हणाल्या, ‘जर का आम्ही इतकी दशके इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे, तर निदान माझ्या मुलाला एका व्यासपीठ तरी मिळायला हवे. मला माझ्या मुलाच्या प्रतिभेवर विश्वास आहे. तो अष्टपैलू अभिनेता आहे. त्यामुळे अशा प्रतिभेला एक संधी मिळाली पाहिजे.’ लवकरच आपण बॉबीला काही ओळखीच्या लोकांकडे घेऊन जाणार असल्याचे किशोर शहाणे यांनी सांगितले.