बॉलिवूड मधील अभिनेत्री जूही चावला (Juhi Chawla) हिने गेल्या काही दिवसांपूर्वीच देशातील 5जी नेटवर्कसाठी विरोध केला होता. याच प्रकरणात आता अभिनेत्रीने मे महिन्यात या संबंधित आदेशात संशोधनाची मागणी करत दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आता जूही चावला हिने ही याचिका मागे घेतली आहे. जूहीने 31 मे रोजी दिल्ली हायकोर्टासमोर मत मांडत असे म्हटले होते की, लोक, जनावरे आणि झाडाझुडपांवर रेडिएशन मुळे होणाऱ्या मुद्द्यांवरुन काही प्रश्न उपस्थितीत केले होते. पण गेल्याच महिन्यात कोर्टाने तिचा हा खटला रद्द केला होता आणि तिला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
न्यायाधीश जयंत नाथ यांनी जूही चावलाचे वकील दीपक खोसला यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या विधानानंतर याचिका परत घेण्यास परवानगी दिली आहे. जूहीच्या वकीलांनी आपली बाजू मांडली की, कधीही प्रकरण खटलाच्या स्तरावर गेले नाही. फक्त सिव्हिल प्रक्रिया संहिता संदर्भात फेटाळून लावली जाते.(Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी फसवणूकीविरोधात पोलिसात दाखल केली तक्रार)
जनावर आणि मुलांवरील याच्या प्रभावावर चिंता व्यक्त करत म्हटले की, जूही चावलाने देशात 5जी नेटवर्कची स्थापनेला आव्हान देण्यासाठी 31 मे रोजी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. जूही चावलाने आपल्या याचिकेत दावा केला होता की, एकदा 5जी लागू झाल्यानंतर कोणताही एक्सपोजर पासून बचाव करु शकत नाही. दिल्ली हायकोर्टाने 4 जून रोजी 5जी वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाला आव्हान देणाऱ्या जूही चावला हिची याचिका फेटाळून लावली आणि याचिकाकर्त्यांवर 20 लाख रुपयांचा दंड लावला. कोर्टाने असे म्हटले की याचिका दोषपूर्ण, कायदेशीर प्रक्रियेचा दूरउपोय आणि प्रचार मिळवण्यासाठी दाखल केली होती.