अभिनेत्री दिशा पटानी हिची रिक्षा सवारी; पहा Photos
Disha Patani Takes an Auto-Rickshaw Ride (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती स्वत:चे हॉट फोटोज, व्हिडिओज नियमितपणे शेअर करुन चाहत्यांना खिळवून ठेवतो. सध्या तिचे काही वेगळे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात ती रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे. आलिशान कारमधून फिरणाऱ्या दिशा पटानीला रिक्षात पाहून चाहत्यांकडून आर्श्चय व्यक्त केले जात आहे. (बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी च्या 'या' पाच बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पहा अभिनेत्रीचा सेक्सी अंदाज)

जाहिरातीचे वर्सोवा येथील शूटिंग संपवून ती बोटीतून उतरली आणि मग कारने प्रवास न करता तिने घर गाठण्यासाठी तिने रिक्षा सवारी करणे पसंत केले. या फोटोत तुम्ही पाहू शकाल की, दिशाने काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आणि शॉर्ट टॉप घातला आहे. त्यावर सफेद रंगाचे स्निकर्स खुलून दिसत आहेत.

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Avinash Kamble (@ak_paps)

दिशाची रिक्षा सवारी सर्वसामान्य चाहत्यांना सुखावणारी असेल. तसंच कोविड-19 नियमांचे पालन करण्यासाठी तिने मास्कही घातलेला दिसत आहे. 2016 मध्ये आलेल्या एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातून दिशाने बॉलिवूडमध्ये पर्दापण कले होते. त्यानंतर तिच्या अभिनय आणि फॅशनचे चाहते दिवसेंदिवस वाढतच आहेत.

दरम्यान, दिशा 'मलंग' या सिनेमात झळकली होती. या सिनेमात दिशा आणि आदित्य रॉय कपूर सोबत ही जोडी पाहायला मिळाली. आता लवकरतच ती सलमान खान याच्या 'राधे: द मोस्ट व्हॉन्टेट भाई' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केले आहे.