Actress Amisha Patel (PC - Facebook)

Case File Against Ameesha Patel: बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) पुन्हा एकदा वादात सापडली असून, पैसे घेऊन एका कार्यक्रमात अपूर्ण परफॉर्मेंस केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी तिच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. खरे तर हे प्रकरण खंडवा येथील कोतवाली पोलिस ठाण्यातील आहे. तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुनील जैन यांनी तिच्याविरोधात ही तक्रार दाखल केली असून, अमिषा पटेलने पूर्ण पैसे घेऊनही तिचा कार्यक्रम पूर्ण केला नाही, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. अमिषा तिच्या कार्यक्रमासाठी म्हणजे 23 एप्रिलला उशिरा पोहोचली होती. केवळ 5 मिनिटे डान्स करून ती निघून गेली. अभिनेत्रीच्या या वृत्तीमुळे समितीही संतापली. तसेच अमीषाच्या अशा वागण्याने आयोजक आणि प्रेक्षकांची निराशा झाली आहे. (हेही वाचा - आदित्य नारायणने 2 महिन्यांच्या मुलीसह कौटुंबिक फोटो केला शेअर, चाहते म्हणाले - आजचा सर्वोत्तम फोटो)

एकीकडे अभिनेत्रीवर गुन्हा दाखल होत असतानाचं दुसरीकडे अमिषानेही ट्विट करत आयोजकांवर संताप व्यक्त केला आहे. तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अभिनेत्रीने लिहिले आहे की, "काल 23 एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील खंडवा शहरात नवचंडी महोत्सव 2022 ला उपस्थित राहिले. फ्लॅश एंटरटेनमेंट आणि श्री अरविंद पांडे यांनी कार्यक्रमाचे खूप वाईट पद्धतीने आयोजन केले होते. मला माझ्या जीवाला धोका आहे असे वाटले, पण माझी चांगली काळजी घेतल्याबद्दल मला स्थानिक पोलिसांचे आभार मानायचे आहेत."

दरम्यान, अमीषाचे नाव अशाप्रकारे वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. कार्यक्रमाला उशिरा पोहोचणे, कार्यक्रम न करणे किंवा आयोजकांशी भांडणे या कारणांमुळे ती यापूर्वी अनेकदा चर्चेत आली आहे. अलीकडे, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सोनिया गांधी यांच्या अत्यंत जवळचे असलेले दिवंगत नेते अहमद पटेल यांचा मुलगा फैसल पटेल यांच्याशी असलेल्या तिच्या नात्याबद्दलही ती चर्चेत होती. त्यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर होत्या. अमिषाने या बातम्यांचे खंडन केले आहे. मात्र, फैजलसोबतच्या व्हायरल फोटोंमध्ये ती ज्या जवळीकतेने दिसली होती, त्यावरून दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याची चर्चा आहे.

अमीषाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमिषा पटेल बऱ्याच दिवसांनी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. सध्या ती 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सनी देओल दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा करत आहेत. उत्कर्ष शर्माही 'गदर 2'मध्ये सनी देओलसोबत दिसणार आहे. गदर या मेगाहिट चित्रपटाचा हा सिक्वेल असल्याने या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.