Endorsing Tobacco Case: तंबाखूचे समर्थन केल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांना नोटीस जारी
Shah Rukh Khan, Akshay Kumar, Ajay Devgn (PC - Facebook)

Endorsing Tobacco Case: गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी (Advertisement of Gutkha companies) बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अवमान याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठाला (Lucknow Bench) यासंदर्भात सूचना दिली आहे. ही याचिका वकील मोतीलाल यादव यांनी दाखल केली होती. ज्यामध्ये भारत सरकारच्या पद्म पुरस्कार विजेत्या कलाकारांच्या गुटख्याच्या प्रचारात कथित सहभागाचे मुद्दे उपस्थित केले होते. जे मोठ्या प्रमाणावर जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

न्यायालयाने ऑगस्ट 2023 मध्ये कॅबिनेट सचिव, मुख्य आयुक्त आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांना नोटिसाही बजावल्या होत्या, ज्यात सप्टेंबर 2022 च्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल अवमानाची कारवाई करण्याची मागणी केली होती. ज्यामध्ये याचिकाकर्त्याला शुल्क आकारण्याचे निर्देश देण्यात आले होते. (हेही वाचा -Pan Masala Ad: विमलच्या नवीन जाहिरातीसाठी Akshay Kumar ला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केले ट्रोल)

नोटीसला उत्तर देताना डेप्युटी सॉलिसिटर जनरल यांनी न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाला सांगितले की, 20 ऑक्टोबर रोजी अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. (वाचा - अल्लू अर्जुनने तंबाखूची जाहिरात करण्यास दिला नकार, करोडो रुपयांची ऑफर नाकारली)

त्याचवेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी संबंधित पान मसाला कंपनीला गुटखा कंपनीसोबतचा करार संपल्यानंतरही जाहिरातीत दाखवल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली होती. उच्च न्यायालयात आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 तारखेला 2024 ला होणार आहे.