सोनू सूद (संग्रहित संपादित प्रतिमा)

गणेशोत्सव (Ganeshotsav 2020) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासाठी अनेक चाकरमानी आपल्या घरी जातात. कोकणात (Konkan) तर गणपतीचा फार मोठा उत्सव असतो. मात्र सध्याच्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) परिस्थितीमध्ये कोकणात जाणाऱ्या लोकांची आर्थिक लुट होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या खाजगी वाहन चालकांनी आपले दर वाढवले आहेत. म्हणूनच याबाबत अभिनेता सोनू सूद  (Sonu Sood) कडे मदत मागितली असता, सोनू गणपतीसाठी लोकांना त्यांच्या घरी पोहोचवणार असल्याचे समोर येत आहे. याबाबत एका ट्वीटला उत्तर देताना सोनूने ही गोष्ट सांगितली आहे.

निखील परब याने ट्वीट करत लिहिले होते की, ‘आमचा गणपतीचा उत्सव येऊ घातला आहे मात्र घरी जाण्यासाठी मुंबई ते मालवण या प्रवासासाठी प्रत्येक व्यक्तीमागे 3 हजार रुपये आकारले जात आहेत. सर्वसामान्यपणे या प्रवासाचा दर 500 रुपये आहे व ई-पासासाठी 500 रुपये, म्हणजे 1000 रुपयांच्या प्रवासाठी 3 हजार रुपये घेतले जात आहेत. सोनू सूद तुम्ही गणपती उत्सवासाठी आम्हाला घरी जाण्यास मदत करू शकता का?’

पहा ट्वीट - 

या ट्वीटला प्रत्युत्तर देताना सोनूने लिहिले आहे की, ‘कोणालाही काहीही देण्याची गरज नाही. तुमचे तपशील पाठवा. गणपती बाप्पा मोरया!’ तर अशा प्रकारे गणपतीला घरी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मदतीसाठी सोनू सूद धावून आला आहे. (हेही वाचा: लॉकडाउनच्या काळात स्थलांतरीत मजुरांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद आता देणार रोजगार)

दरम्यान, देशात कोरोना व्हायरसमुळे लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर, अनेक परप्रांतीय मजुरांनी आपापल्या गावी जाण्याचा मार्ग निवडला. त्या काळात दळणवळणाची साधने ठप्प झाली झाली असताना घरी जाण्यासाठी लोकांची बरीच परवड झाली. त्याचवेळी अभिनेता सोनू सूद मदतीसाठी धावून आला. त्याने स्वखर्चाने अनेक कामगारांना आपापल्या घरी पोहोचवले. त्यानंतर विविध अडचणींचा सामना करत असलेल्या अनेक नागरिकांनी सोनूकडे मदतीची याचना केली व सोनुने त्याला शक्य होईल त्या प्रमाणे लोकांना मदतही केली. आता गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या लोकांना सोनू मदत करणार आहे.