अभिनेता कुशल पंजाबी याच्या आत्महत्येवर पत्नी ऑड्री डोल्हेन हिची धक्कादायक प्रतिक्रिया; वाचा सविस्तर
Kushal Punjabi (Photo Credits: Instagram)

अभिनेता कुशल पंजाबी (Kushal Punjabi) याच्या आत्महत्येने बॉलिवूड सहित मनोरंजन विश्वात खळबळ उडाली होती. नैराश्यापोटी जीवन संपवलेल्या कुशल साठी प्रत्येकाने हळहळ व्यक्त केली होती, काही माध्यमांच्या व कुशलच्या जवळच्या व्यक्तींच्या माहितीनुसार या आत्महत्येमागे कुशल चे दुःखी वैवाहिक जीवन हे कारण सांगण्यात आले होते. पत्नीसोबतचा वादामुळे त्याला आपल्या मुलांना भेटण्याची देखील संधी मिळत नव्हती अशातच त्याची आर्थिक बाजूही कमजोर होत गेल्याने नैराश्य आले आणि त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले अशी माहिती आपणापर्यंत आली आहे. मात्र अलीकडे या सगळ्या प्रकरणात कुशलची पत्नी ऑड्री डोल्हेन(Audrey Dolhen) हिने धक्कादायक प्रतिक्रिया देत, “तो आमच्या नात्यात अपयशी ठरला”,आणि म्ह्णून लग्नात समस्या आल्या असे म्हंटले आहे आणि या सगळ्यामुळे त्याने जर का आत्महत्या केली असली तरी मला त्यासाठी का दोषी ठरवलं जातंय असा सवालही तिने केला आहे.

(हे ही वाचा-सतत सुंदर दिसण्याच्या दबावामुळे डिप्रेशन येतं; कुशल पंजाबी यांच्या आत्महत्येनंतर चिन्मयी सुमित राघवन हिची भावुक फेसबुक पोस्ट व्हायरल)

नुकतीच ‘पिपिंगमून’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ऑड्री हिने सांगितले की, “माझ्यावर का टीका होतेय हे मला माहित नाही. आमच्या नात्यात कुशल अपयशी ठरला. त्याला कुटुंबाचं गांभीर्य कळत नव्हतं. तो एक वडील म्हणूनही निष्काळजी होता. त्याच्या मुलाच्या भवितव्याचा त्याने कधीच विचार केला नव्हता. मी आमचा कियानला कधीच त्याच्याशी बोलण्यापासून थांबवलं नव्हतं. इतकंच काय तर आम्ही कित्येक वेळा कुशलला शांघायला येऊन आमच्यासोबत राहायला सांगितलं होतं पण त्यात त्याला कधीच इच्छा नवह्ती. उलट, माझ्या खर्चावर घर इतकी वर्ष चाललं होतं.”

दरम्यान कुशलने आपल्या सुसाईड नोटमध्ये कुणालाही दोष न देता,"विवाह एक जुगार आहे आणि ते स्वर्गात लिहिलेले नाहीत? असे विधान लिहिले होते यामुळे त्याच्या आत्महत्येच्या मागील कारण फार स्पष्टपणे दिसून येते मात्र तरीही ऑड्री हिची प्रतिक्रिया या मृत्यूला वेगळे वळण देऊन जात आहे.