Actor Asif Basra Dies By Suicide: बॉलिवूड अभिनेता आसिफ यांची आत्महत्या, पाळीव कुत्र्याच्या दोरीच्या साहाय्याने घेतला गळफास
Asif Basra (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारांचे आत्महत्येचे सत्र काही संपण्याचे नाव घेत नाही. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकारांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा (Asif Basra) यांनी देखील गळफास लावून आत्महत्या (Asif Basra Commit Suicide) केल्याचे समोर आले आहे. हिमाचल प्रदेशच्या कांगड़ा जिल्ह्यातील धर्मशाळेतील मैक्लोडगंज स्थित एका कॅफेमध्ये त्यांनी आत्महत्या केली आहे. ही बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. त्यांनी आपल्या कुत्र्याच्या दोरीने गळफास लावण्याचे सांगण्यात येत आहे.

न्यूज 18 ने दिलेल्या रिपोर्टनुसार, कांगड़ा च्या एसपी विमुक्त रंजन ने या घटनेची माहिती दिली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचली आणि आसिफ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

आसिफ ने आत्महत्या का केली असावी याचे कारण अद्याप समोर आलेली नाही. तसेच त्यांच्या मृतदेहाजवळून कुठलेही सुसाईड नोट देखील सापडली नाही. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात येत आहे की, आसिफ मैक्लोडगंजमध्ये त्यांनी भाड्याने एक घर घेतले होते. जेथे ते मागील 5 वर्षापासून राहत होते. हेदेखील वाचा- RIP Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येविषयी निर्माते मुकेश भट यांनी केले 'हे' धक्कादायक विधान

असेही सांगण्यात येत आहे की, युनायडेट किंग्डमच्या एका महिलेसोबत ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आज दुपारी ते आपल्या कुत्र्याला फिरविण्यासाठी बाहेर घेऊन गेले आणि घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या कुत्र्याच्या दोरीनेच गळफास लावून घेतला. आसिफ बसरा हे 53 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. काय पो चे, एक व्हिलन, जब वी मेट, फ्रेक अली, क्रिश 3 यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. एक व्हिलन या चित्रपटात त्यांनी श्रद्धा कपूरच्या वडिलांची भूमिका केली होती.