Akshay Kumar | Twitter

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याने अखेर आपली कॅनेडियन सिटीझनशीप ( Canadian Citizenship) सोडली आहे. आज भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना त्याने ट्वीटर वर एक खास फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये भारतीय कागदपत्र आहे ज्यात त्याच्या नागरिकत्त्वाचा समावेश आहे. अक्षय कुमारने हे ट्वीट 'दिल आणि नागरिकत्त्व' दोन्ही हिंदुस्थानी' असं म्हटलं आहे. दरम्यान अक्षय ने अनेकदा राष्ट्रप्रेमाचे संदेश दिले आहेत पण तो कॅनडाचं नागरिकत्त्व घेतल्यावरून बर्‍याचदा ट्रोल झाला आहे.

2019 मध्येच अक्षय ने एका वृत्तपत्रकासोबत बोलताना आपण लवकरच भारतीय पासपोर्ट साठी अर्ज करणार असल्याचं म्हटलं होतं. पण त्यानंतर कोविड 19 चं संकट आलं आणि ही प्रक्रिया लांबली. आता अखेर अक्षय कडे भारतीय नागरिकत्त्व आलं आहे. कॅनडाचं नागरिकत्त्व असल्याने मी कमी भारतीय आहे असं होत नसल्याचं तो तेव्हा म्हणाला होता पण आता अखेर त्याने भारतीय नागरिकत्त्व घेतलं आहे. 2000 साली अक्षयने कॅनडाचं नागरिकत्त्व स्वीकारलं होतं. काही वर्षांपूर्वी, वैयक्तिक परिस्थितीमुळे त्याला कॅनेडियन नागरिकत्वाची निवड करण्यास भाग पाडले. मात्र, असे असूनही ते गेल्या दशकात सर्वाधिक करदात्यांच्या यादीत होता.

पहा ट्वीट

अक्षय कुमारचा नुकताच 'ओएमजी 2' सिनेमा रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर त्याच्या समोर गदर 2 चं आव्हान आहे. दरम्यान लवकरच अक्षय महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.