Ejaz Khan (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Episodes of House Arrest Removed From Ullu App: आतापर्यंत अनेक वादांनी वेढलेल्या एजाज खान (Ejaz Khan) ने आता एका नवीन वादाला जन्म दिला आहे. आता त्याच्या वादग्रस्त शो 'हाऊस अरेस्ट' (House Arrest) बद्दलचा वाद वाढत चालला आहे. हा वाद शोमधील अश्लील कंटेंटबद्दल आहे, ज्याचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओमध्ये, तो महिला स्पर्धकांना अश्लील पोझ करून दाखवण्यास सांगण्यात आहे. या क्लिप्स व्हायरल होताच, शोवर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली. बजरंग दलानेही शोच्या आशयावर आक्षेप व्यक्त केला आणि तक्रार दाखल केली. आता बजरंग दलाच्या तक्रारीवरून उल्लू अॅपने मोठा निर्णय घेतला आहे.

उल्लू अ‍ॅपमधून हाऊस अरेस्टचे एपिसोड काढले -

उल्लू अॅपवरील 'हाऊस अरेस्ट' नावाच्या शोवर बजरंग दलासह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप व्यक्त केला. अशा परिस्थितीत, बजरंग दलाने शोबाबत सुरू असलेल्या वादाबद्दल तक्रार दाखल केली होती आणि आता वाद वाढत असल्याचे पाहून, उल्लू अॅपने हाऊस अरेस्टचे सर्व शो ऑफ एअर केले आहेत. तसेच बजरंग दलाला औपचारिकपणे पत्र लिहून माफी मागितली आहे. (हेही वाचा - House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स)

राष्ट्रीय महिला आयोगाकडून समन्स -

याशिवाय, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) देखील या शोवर आक्षेप व्यक्त केला असून उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि होस्ट एजाज खान यांना समन्स पाठवले. दोघांनाही 9 मे पर्यंत राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अ‍ॅपवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप आहे. समन्सनुसार, 29 एप्रिल 2025 रोजी शोची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ज्यामध्ये एजाज खान महिला स्पर्धकांना त्यांचे कपडे काढून कॅमेऱ्यासमोर कामसुत्रातील पोझ देण्यास सांगताना दिसत आहे. (वाचा - House Arrest Web Show Controversy: अभिनेता एजाज खान याच्याविरुद्ध एफआयआर दाखल; Ullu App वर अश्लील सामग्री पसरवल्याचा आरोप)

दरम्यान, बाल हक्क संरक्षण आयोगाने गेल्या वर्षी मार्चमध्ये उल्लू अॅपवर कारवाईची मागणी केली होती. आयोगाने आयटी मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या अ‍ॅपमधील कंटेंटचा शालेय मुलांवर वाईट परिणाम होत आहे. शाळकरी मुलांना लक्ष्य करून, उल्लू अॅप अश्लील सामग्री असलेले शो बनवत आहे, ज्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बाल हक्क संरक्षण आयोगाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस कोणत्याही केवायसी धोरणाचे किंवा वय पडताळणीच्या नियमांचे पालन करत नाहीत. उल्लू अॅपमधील मजकूर POCSO कायद्याचे उल्लंघन करतो, ज्याची आयोगाने दखल घेतली आहे.