बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ने आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सारा ही त्या स्टार किड्सपैकी एक आहे, ज्यांनी त्यांच्या दमदार भूमिकांनी लोकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. सध्या सारा अली खान तिच्या आगामी 'मर्डर मुबारक' आणि 'ए वतन मेरे वतन' या दोन चित्रपटांमुळे चर्चेत आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये सारा पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या दोन्ही चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, नुकतीच साराची एक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे तिचे चाहते हैराण झाले आहेत.
अलीकडेच सारा आला खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मेकअप रूममध्ये बसून तिचा मेकअप करताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे, सारा तिच्या बडबडी स्टाईलमध्ये प्रेक्षकांना नमस्ते म्हणत व्हिडिओची सुरुवात करते. यानंतर, ती व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे की, यावेळी ती एकाच वेळी दोन चित्रपटांचे प्रमोशन करत आहे, ज्यामुळे ती अपघाताची शिकार झाली आहे. (हेही वाचा -Murder Mubarak movie Trailer: मर्डर मुबारक चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, विजय वर्मा, सारा, करिश्मा कपूर, पंकज त्रिपाठी मोठ्या कलाकारांची फौज)
View this post on Instagram
अभिनेत्रीने सांगितले की, प्रमोशन करताना तिचे पोट भाजले. मात्र, हा अपघात तिच्यासोबत कसा झाला हे साराने सांगितले नाही. सध्या साराचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करून तिच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत आहेत. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सारा लवकरच दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यातील पहिला चित्रपट 'मर्डर मुबारक' हा नेटफ्लिक्सवर 15 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा - Aamir Khan New Look: 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानचा नवा खतरनाक लुक चर्चेत, फोटो व्हायरल)
याशिवाय सारा आला खान 'ए वतन मेरे वतन'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 21 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रसारित होणार आहे. दोन्ही चित्रपटांच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली होती. आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.