ऐश्वर्यासाठी अभिषेक करणार करवा चौथचे व्रत ; सोशल मीडियावरुन दिली माहिती
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन (Photo Credits: Instagram)

आज देशभरात करवा चौथचा सण अगदी उत्साहात साजरा केला जाईल. करवा चौथच्या दिवशी विवाहीत महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. यात बॉलिवूड सेलिब्रेटीही काही मागे नाहीत. बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय बच्चन देखील करवा चौथचे व्रत दरवर्षी करते. पण यंदा अभिषेक बच्चनने त्याच्या खास निर्णयामुळे सर्व पतींपुढे एक आदर्श ठेवला आहे. अभिषेक बच्चन देखील यंदा पत्नी ऐश्वर्यासाठी करवा चौथचे व्रत ठेवणार आहे. याची माहिती खुद्द अभिषेक बच्चनने सोशल मीडियावरुन दिली आहे. त्याचबरोबर त्याने करवा चौथचे व्रत करणाऱ्या स्त्रियांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

अभिषेकने ट्विटमध्ये लिहिले की, "करवा चौथ करणाऱ्या सर्व महिलांना शुभेच्छा. त्याचबरोबर त्या आज्ञाधारक पतींनाही शुभेच्छा जे आपल्या पत्नीसाठी व्रत करतात. मी करतो."

2007 मध्ये ऐश्वर्या अभिषेक विवाहबद्ध झाले होते. गुरू सिनेमाच्या शूटिंगदरम्यान या दोघांमधील जवळीक वाढली.

लवकरच दोघेही 'गुलाबजामून' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतील, अशी चर्चा आहे. या सिनेमात अमिताभ बच्चनही झळकणार असल्याचे बोलले जात आहे. या सिनेमाची निर्मिती अनुराग कश्यप यांनी करणार असून सर्वेश मेहरा दिग्दर्शनाची सुत्रं सांभाळणार आहेत. यापूर्वी ऐश्वर्या-अभिषेक 'रावन' सिनेमात एकत्र झळकले होते. आता पुन्हा एकदा 8 वर्षांनंतर रुपेरी पडदा एकत्र गाजवण्यासाठी दोघेही सज्ज झाले आहेत.