 
                                                                 Abhishek Bachchan Birthday Special: आज अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अभिषेक बच्चनच्या 'मनमर्जिया' (Manmarziyaan) सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून बरेच कौतुक झाले. मात्र आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये अभिषेक बच्चन स्टार झाला नाही. 'रेफ्यूजी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणाऱ्या अभिषेकने 4 वर्षात 17 फ्लॉप सिनेमे दिले. त्यानंतर 'धूम' सिनेमाने अभिषेकचे करिअर सावरायला काहीशी मदत केली. 'युवा,' 'ब्लफमास्टर,' 'बंटी और बबली,' 'गुरु' आणि 'दोस्ताना' यांसारखे हिट सिनेमे देण्यात अभिषेकला यश आले. (सलमान खान - ऐश्वर्या रायचा 'हम दिल दे चुके सनम' अभिषेक बच्चनचा आवडता रोमॅन्टिक सिनेमा)
'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये (Guinness Book of World Records)अभिषेकच्या नावाची नोंद आहे. याचे कारण म्हणजे 'पा' (Paa) सिनेमा. या सिनेमात त्याने आपले वडील अमिताभ बच्चन यांच्या वडीलांची भूमिका साकारली होती. यामुळे त्याचे नावे वर्ल्ड रेकॉर्ड बनला आहे.
ऐश्वर्याशी नाते जुळण्यापूर्वी अभिषेकचा साखरपुडा अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत झाला होता. मात्र 3 महिन्यातच हे नाते तुटले. त्यानंतर 20 एप्रिल 2007 मध्ये अभिषेक-ऐश्वर्या विवाहबद्ध झाले. त्यानंतर काही वर्षात 'आराध्या' नावाची परी त्यांच्या आयुष्यात आली. लवकरच अभिषेक-ऐश्वर्या 'गुलाबजामुन' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतील.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
