Aamir Khan ची मुलगी Ira Khan आपल्या फिटनेस कोचच्या प्रेमात? (See Pics)
Ira Khan & Nupur Shikhare (Image Credit: Instagram)

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सोशल मीडियावर फार कमी अॅक्टीव्ह असतो. केव्हातरी एखाद्या पोस्टमुळे तो चर्चेत येतो. परंतु, त्याउलट त्याची मुलगी इरा खान (Ira Khan). ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते. ती सातत्याने सोशल मीडियावर नवे फोटोज, व्हिडिओज शेअर करत असते. इतकंच नाही तर अगदी बिनधास्त आणि मोकळेपणाने अनेक गोष्टी शेअर करत असते. अगदी तिच्या रिलेशनशीपबद्दलही ती खुलेपणाने बोलते. मिसाल कृपलानी सोबत असलेल्या रिलेशनशीपमध्ये असतानाही ती त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत होती. परंतु, आता ते दोघेही वेगळे झाले आहेत. यातच इराचे नाव तिचा फिटनेस कोचसोबत जोडले जावू लागले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इरा आपला फिटनेस कोच नूपुर शिखरे (Nupur Shikhare) ला डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार. लॉकडाऊनमध्ये नूपुर आणि इरा एकमेकांच्या प्रेमात पडले. इतकंच नाही तर त्यांचे संबंध इतके घट्ट झाले आहेत की दोघांनीही आमिर खान च्या फार्महाऊसवर सुट्ट्याही एकत्र घालवल्या. त्यानंतर इराने आई रीना दत्त सोबत नूपुरची भेट घडवून दिली. दोघांनीही आपल्या जवळच्या मित्रांसोबत एकत्र सणाचा आनंद घेतला. (Clinical Depression च्या पोस्टवरुन ट्रोल करणाऱ्यांना Aamir Khan ची मुलगी Ira Khan चा इशारा; उचलणार 'हे' पाऊल)

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Popeye ⚓ (@nupur_shikhare)

यापूर्वी इराने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आपल्या डिप्रेशनचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता. यावर तिला अनेक प्रतिक्रीया मिळाल्या. अनेकांनी तिला ट्रोलही केले. तर कंगना रनौत हिने देखील यावर तिखट प्रतिक्रीया देताना म्हटले, तुटलेल्या कुटुंबातील मुलांना नेहमीच अशा समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र इरानेही यापुढे ट्रोल करणाऱ्यांना ब्लॉक करण्यात येईल, अशी तंबी चाहत्यांना दिली होती.