Andaz Apna Apna-2: 'अंदाज अपना अपना'च्या सिक्वेलवर मोठी अपडेट, आमिर खानने दिली माहिती
Andaz Apna Apna | Photo Credits: Youtube

आमिर खानने (Aamir Khan) गुरुवारी, 14 मार्च रोजी आपला 59 वा वाढदिवस साजरा करत 60 व्या वर्षात पदार्पण केले. आमिर खानने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमिर खानने आपल्या कारकिर्दीतील सुपरहिट आणि आयकॉनिक चित्रपट 'अंदाज अपना अपना'च्या (Andaz Apna Apna) सिक्वेलबाबत मोठी अपडेट दिली आहे.  दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे  अंदाज अपना अपना-2 च्या सिक्वेलवर काम करत आहेत. सध्या हे प्राथमिक स्तरावर  असल्याचे आमिरने म्हटले आहे.  (हेही वाचा - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता Ram Gopal Varma उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, पोस्ट करून दिली माहिती)

30 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या राजकुमार संतोषी यांच्या 'अंदाज अपना अपना'  या चित्रपटाने धमाल केली. सलमान खान आणि आमिर खानची जोडी हिट ठरली होती. या चित्रपटात करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्याही भूमिका होत्या. गेल्या काही वर्षांपासून याच्या सिक्वलबाबतच्या बातम्या चर्चेत होत्या. आता आमिर खाननेच्य या बातम्यांना दुजोरा दिला असून  संपुर्ण माहिती देणे थोडं घाईचे होईल असेही आमिर खानने स्पष्ट केले.

1994 मध्ये रिलीज झालेला 'अंदाज अपना अपना' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली होती. पण हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक कल्ट चित्रपट ठरला. या चित्रपटात परेश रावल, शक्ति कपूर, विजू खोटे,  शहजाद खान, जावेद खान यांच्या भूमिकेने धमाल उडवून दिले. 'अंदाज अपना अपना' हा चित्रपट छोट्या पडद्यावर झळकल्यानंतर प्रेक्षकांची त्याला पसंती मिळाली.  चित्रपटातील संवाद आजही लोकांच्या आठवणीत आहेत.