अभिनेता आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) खऱ्या अर्थाने विकी डोनरपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली व आता त्याने उत्तम आशयाच्या फिल्म्सद्वारे, चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. महत्वाचे म्हणजे आयुष्मानचे काम दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय ठरत आहे. आयुष्मानचे तब्बल 5 चित्रपट दक्षिणात्य भाषांमध्ये रिमेक (Remake) होणार आहेत. याबाबत आयुष्मानने आपला आनंद व्यक्त केला आहे. चित्रपटांमध्ये भाषा, संस्कृती आणि सीमा ओलांडण्याची क्षमता आहे, असे आयुष्मान म्हणाला. आतापर्यंत आयुष्मानचे पाच सुपरहिट चित्रपट दक्षिणेत पुन्हा तयार होण्याच्या मार्गावर आहेत.
'अंधाधुन' हा तेलगू आणि तामिळ भाषेत, 'ड्रीम गर्ल' तेलगूमध्ये, 'विक्की डोनर' तमिळमध्ये बनविला आहे. याखेरीज तामिळमध्ये 'अनुच्छेद 15' आणि तेलगूमध्ये 'बधाई हो' बनविण्याच्या विचार केला जात आहे. याबाबत आयुष्मान म्हणतो, ‘माझ्या बर्याच चित्रपटांचे रिमेक होत आहेत, हे पाहून खूपच समाधान आणि संतुष्ट आहे. मुख्य म्हणजे हे चित्रपट दक्षिणेत बनत आहेत हे आश्चर्यचकित करणारे आहे. सिनेमाची खरी कसोटी हीच आहे की, चित्रपट किती जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. मला आनंद आहे की, माझे चित्रपट सीमा ओलांडत आहेत.’ (हेही वाचा: Salman Khan Brand FRSH: सलमान खानने लॉन्च केला पर्सनल ब्रँड 'फ्रेश'; 'सॅनिटायझर्स'पासून सुरुवात, जाणून घ्या किंमत)
दरम्यान, आयुष्मान खुरानाचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट 'शुभ मंगल ज्यादा सावधान' अमेरिकेत फारच लोकप्रिय ठरला होता. चित्रपटाच्या रिलीझनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते. आता अॅनिमेशन स्टुडिओ पिक्सरने आपल्या नवीन 'आउट' चित्रपटात एक समलैंगिक पात्र समाविष्ट केले आहे. अॅनिमेशन चित्रपटांच्या दृष्टीकोनातून, अशा चित्रपटात मुख्य भूमिकेत समलिंगी व्यक्तिरेखा दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.