Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील Jr NTR च्या चाहत्याने अभिनेत्याच्या नावाच्या विटांचा वापर करून बांधल घर, See Photo
Jr NTR (PC - Instagram)

Andhra Pradesh: नंदामुरी तारका रामाराव म्हणजेच ज्युनियर एनटीआर (Jr NTR) नेहमीचं आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. ज्युनियर एनटीआरने आदि, वृंदावनम, जनता गॅरेज, जय लावा कुसा आणि आरआरआर सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. त्यांना अनेकदा मॅन ऑफ मासेस म्हणून संबोधले जाते. आता, आंध्र प्रदेशातील अभिनेत्याच्या चाहत्याने त्याच्या नवीन घरासाठी अभिनेत्याच्या आद्याक्षरांसह विटा तयार करून त्यापासून घर बांधल आहे. सध्या या विटांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्युनियर एनटीआर सध्या त्याच्या आगामी चित्रपट देवरा: भाग 1 साठी चित्रीकरण करत आहे, ज्यामध्ये जान्हवी कपूर आणि सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेत आहेत. प्रकाश राज, जिसू सेनगुप्ता, श्रीकांत, टॉम चाको, नरेन आणि मुरली शर्मा यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. (हेही वाचा - Tiger 3 New Promo: सलमान खानच्या 'टायगर 3' चा नवीन प्रोमो प्रदर्शित, रिलीजपूर्वी निर्मात्यांनी जारी केला नवीन अॅक्शन-पॅक व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jr NTR (@jrntr)

या चित्रपटात संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिलं आहे. देवरा चित्रपटाचा पहिला भाग 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या अॅक्शन ड्रामाचे दिग्दर्शन कोरतला शिवा यांनी केले आहे. याशिवाय, ज्युनियर एनटीआर वॉर 2 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन मेजर कबीर धालीवालच्या भूमिकेत परत येणार आहे. ब्रह्मास्त्र फेम अयान मुखर्जी याचे दिग्दर्शन करणार आहे.