Dilwale Dulhania Le Jayenge: बॉलीवुडचा सुपरहिट चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झाला होता. मंगळवारी या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने पुढील वर्षी म्हणजेच 2021मध्ये लंडनच्या (London) लीसेस्टर चौकात (Leicester Square) या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री काजोल (Kajol) यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' ही एक प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. यात शाहरुख खान आणि काजोल यांनी राज आणि सिमरन यांच्या भूमिका साकारल्या होत्या.
'हार्ट ऑफ लंडन बिझिनेस अलायन्स'ने सोमवारी याची घोषणा करताना सांगितलं की, 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' मधील कलाकारांच्या मूर्ती लंडनच्या मध्यभागी असलेल्या लेस्टर चौकामध्ये असणाऱ्या देखाव्याचा भाग असणार आहेत.
या चित्रपटाच्या एका सीनमध्ये राज आणि सिमरन एकमेकांना क्रॉस करतात. तेव्हा ते एकमेकांना ओळखतही नसतात. या दृश्याचे चित्रीकरण लीसेस्टर स्क्वेअर येथे करण्यात आले. याशिवाय इतरही अनेक दृश्ये या ठिकाणी शूट करण्यात आली आहेत. (हेही वाचा - Anushka Sharma Baby Bump Pics: सूर्याच्या किरणांनी खुललं गरोदर अनुष्का शर्मा चे सौंदर्य, बेबी बंप दाखवत शेअर केला हा सुंदर फोटो)
UPDATE... Bronze statue of #SRK and #Kajol to be unveiled at #London’s #LeicesterSquare to mark 25th anniversary of #DDLJ... Will be unveiled in Spring 2021... The first ever #Bollywood movie statue erected in #UK... #DDLJ is directed by #AdityaChopra. pic.twitter.com/qqDgrnMipU
— taran adarsh (@taran_adarsh) October 19, 2020
यश राज फिल्मने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हा पुतळा लीस्टर चौकात असलेल्या ओडियोन सिनेमाच्या बाहेर पूर्वेकडील बाजूने स्थापित केला जाईल. पुढील वर्षी या पुतळ्याचे अनावरण होईल. या वेळी काजोल आणि शाहरुख खान उपस्थित राहतील, अशी आयोजकांची आशा आहे.
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' म्हणजेच डीडीएलएजे चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. आजही लोक हा चित्रपट आवर्जून पाहतात. युनायटेड किंगडममध्ये पहिल्यांदाच एका भारतीय चित्रपटाने असे स्थान मिळवले आहे. याची नोंद बॉलीवूडच्या इतिहासात होणार आहे. यापूर्वी डीडीएलजेने बराचं इतिहास घडवला आहेत. हा सिनेमा चित्रपटगृहात अनेक दिवस दाखवण्यात आला होता. या चित्रपटाचे अनेक सीन अद्याप मेम्स म्हणून वापरली जातात.