Anushka Sharma (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस मुळे यंदाचं वर्ष खराब असले तरीही या वर्षी सेलिब्रिटींपासून अनेक क्रिकेट विश्वातील जोड्यांकडून गुड न्यूज मिळाल्या आहेत. यात बॉलिवूडमधील क्युट कपल अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या गोड बातमीने सर्व चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनुष्काही आपले ही गरोदरपण छान एन्जॉय करताना दिसत आहे. आपणा हा अनुभव ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असून त्यासंबंधीचे फोटोज देखील ती सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकताच तिने एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बेबी बंप दाखवत छान सूर्यप्रकाश घेताना दिसत आहे.

अनुष्काचा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला असून या फोटोला 23 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोमध्ये ती बेबी बंपमध्ये सूर्याची कोवळी किरणं घेताना दिसत आहे.

हेदेखील वाचा- Anushka Sharma-Virat Kohli Announce Pregnancy: विराट कोहली-अनुष्का शर्माच्या 'गुड न्यूज' नंतर युजवेंद्र चहल, क्रिस गेलसह खेळाडूंकडून शुभेच्छांचा वर्षाव

 

View this post on Instagram

 

Pocketful of sunshine ☀️☺️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

या फोटोखाली तिने, 'पॉकेट फुल ऑफ सनशाइन' असे कॅप्शन दिले आहे. अलीकडेच तिला IPL सामन्यांदरम्यान दुबईच्या स्टेडियम पाहण्यात आले होते. पती विराट कोहलीला चिअर करण्यासाठी ती आली होती. सध्या विराट आपल्या क्रिकेट सामन्यांमध्ये बराच व्यस्त आहे. त्यामुळे अनुष्का आपल्या नव-याला प्रोत्साहन देण्यासाठी तेथे पोहोचली.