25 Years of Andaz Apna Apna: सचिन तेंडुलकर ने सलमान-आमीर खान च्या धम्माल कॉमेडी 'अंदाज अपना अपना' मध्ये साकारली होती 'ही' भूमिका
Andaz Apna Apna | Photo Credits: Youtube

90 च्या दशकात बॉलिवूडच्या खानचं अधिराज्य होतं. त्यामध्येही आजचा बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान यांचा 'अंदाज अपना अपना' (Andaz Apna Apna) हा सिनेमा आजही खळखळून हसवतो. यंदा या सिनेमाने पंचविशी पूर्ण केली आहे. त्याकाळी बॉक्सऑफिसवर 'फ्लॉप' ठरलेला सिनेमा नंतर टेलिव्हिजनवर सुपरहीट ठरला. आज हा सिनेमा 25 वर्ष पूर्ण करत असताना या सिनेमामधील एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील 'अंदाज अपना अपना'चा एक भाग होता हे तुम्हांला ठाऊक आहे का?

तरूण सचिन तेंडुलकर 'अंदाज अपना अपना' या सिनेमाच्या मुहूर्ताच्या वेळेस उपस्थित होता. आमिर खान, सलमान खान, करिष्मा कपूर, रविना टंडन सोबतच सिनेमाचे दिग्दर्शक राज कुमार संतोषी देखील यावेळेस उपस्थित होते. धर्मेंद्र यांनी या सिनेमाला मुहूर्त क्लॅप दिली होती. यानंतर कलाकारांनी तेथे एक छोटंसं स्किट सादर केलं. त्यामुळे सचिन तेंडुलकर थेट सिनेमात झळकला नसला तरीही तो सिनेमाचा भाग होता. पहा हा खास व्हिडिओ

प्रत्येक वेळेस 'अंदाज अपना अपना' पाहताना त्याचे अनेक रसिक पुन्हा पुन्हा या सिनेमाच्या प्रेमात पडतात. 1994 साली रीलिज झालेल्या या सिनेमाबाबत काही वर्षांपूर्वी बोलताना सिनेमातील मुख्य कलाकार आमीर खान म्हणाला होता,' मला हा सिनेमा आवडला होता. हा मस्तच आहे. पण जेव्हा अपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जादू करू न शकल्याने असं नेमकं का झालं? . काय आणि कुठे चुकलं? असे प्रश्न समोर आले. त्यावेळी आम्हांला समजलेली एक गोष्ट म्हणजे हा सिनेमा नेमका रीलीज कधी झाला हेच लोकांना कळलं नाही. त्यामुळे तो अनेकांनी पाहिली नाही.