2.0 सिनेमा (Photo Credits : Twitter)

2.0 Day 1 Box Office Collection: रजनीकांत (Rajinikanth) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर '2.0' हा सिनेमा 29 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. भारताबरोबरच इतर देशातही हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनानंतर प्रेक्षकांनी या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. बहुचर्चित अशा या सिनेमात अक्षय कुमारचा खलनायकी अवतार पाहायला मिळणार आहे.

ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला (Ramesh Bala) यांच्यानुसार, 2.0 सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 25 कोटींची कमाई करु शकतो. या सिनेमाला साऊथमध्ये भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चेन्नई (Chennai), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), तामिळनाडू (Tamilnadu) या राज्यात सिनेमाला जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. या सर्व ठिकाणी सिनेमाने 2 कोटीहून अधिक कमाई केली आहे.  2.0 सिनेमाला Piracy च्या धोक्याने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी Twitter वर खास आवाहन !

आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' ला चांगली ओपनिंग मिळाली होती. मात्र 2.0 हा सिनेमा 'ठग्ज' चा रेकॉर्ड मोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही सिनेमागृहात तर सकाळी 4 वाजल्यापासून शो ला सुरुवात झाली. रजनीकांत यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी लोकांनी त्यांच्या प्रतिमेला दूधाचा अभिषेकही केला.

2,0 हा भारतातील सर्वात महागडा सिनेमा असून यासाठी तब्बल 600 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन एस. शंकर (S. Shankar) यांनी केले आहे.