15 Years of Kal Ho Naa Ho: अजूनही भावूक करतात सिनेमातील हे खास क्षण! (Videos)
कल हो ना हो (Photo Credits: Youtube)

शाहरुख खान (Shah Rukh Khan), प्रीती जिंटा (Preeti Zinta) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर 'कल हो ना हो' हा सुपरहिट सिनेमा प्रदर्शित होऊन आज 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कल हो ना हो' या सिनेमाने फक्त बॉक्स ऑफिसवरच कमाल केली नाही तर प्रेक्षकांची मनेही जिंकली. त्यासोबतच या सिनेमाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

15 वर्षपूर्ती निमित्त सिनेमाचा निर्माता करण जोहरने सिनेमातील खास क्षणांचा व्हिडिओ ट्विट करत लिहिले की, "कल हो ना हो ची 15 वर्षे."

पाहा हा खास व्हिडिओ....

यानिमित्ताने पाहुया सिनेमातील काही भावूक करणारे क्षण...

'कल हो ना हो' या गाण्यासाठी सोनू निगमला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर या गाण्यासाठी शंकर एहसान लॉय यांना देखील सर्वोत्कृष्ट संगीतकार पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.