Kumar Sanu, Alka Yagnik, Udit Narayan  यांना FWICE यांच्याकडून नोटीस;  अमेरिकेत पाकिस्तान च्या कार्यक्रमात परफॉर्म न करण्याचे आवाहन
kumar sanu, alka yagnik, udit narayan (Twitter)

भारत-पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यातील तणावाचे परिणाम सध्या सिनेमा सृष्टीतील उद्योगावरही दिसत आहेत. बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू (Kumar Sanu), उदित नारायण (Udit Narayan) आणि अल्का याज्ञिक (Alka Yagnik) यांना एफडब्ल्यूईसी कडून नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच अमेरिकेत होणाऱ्या पाकिस्तानच्या कार्यक्रमात परफॉर्म न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याआधी दिलजीत दोसांज (Diljit Dosanjh) अमेरिकेत एक कार्यक्रम करणार होते, त्यावर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (Federation of Western India Cine Employees) यांनी आक्षेप घेत म्हणाले होते की, दिलजितने हा प्रस्ताव पाकिस्तानच्या रेहान सिद्दीकी यांच्यामुळे कार्यक्रमासाठी होकार दिला होता. हे प्रकरण इतके वाढले होते की, दिलजितला त्याचा शो रद्द करावा लागला होता.

एफडब्ल्यूईसी ने अल्का याज्ञिक  (Alka Yagnik) , कुमार सानू (Kumar Sanu)  आणि उदित नारायण (Udit Narayan)  यांना पत्र लिहून म्हटले आहे की, 'आम्हाला माहिती आहे की आपण 1 नोव्हेंबर रोजी अमेरिकेमध्ये पाकिस्तानी नागरिक मोजम्मा हुनैन (Moazzma Hunain) यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात परफॉर्म करणार आहात. कृपया या कार्यक्रमातून आपण माघार घ्यावा, अशी विनंती एफडब्ल्यूईसी यांच्याकडून पत्राच्या माध्यमातून या कलाकरांना करण्यात आली आहे. हे देखील वाचा-V Unbeatable डान्स ग्रुपच्या America Got Talent स्पर्धेमधील अंतिम सादरीकरणात रणवीर सिंह असणार लकी चार्म

ANI चे ट्विट-

एफडब्ल्यूईसी यांनी या नोटीसमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणि अनुच्छेद ३७० यांचाही उल्लेख केला आहे. ज्याप्रकारे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे, यामुळे भारतातील कलाकारांनी देशाबद्दल विचार केला पाहिजे. तसेच या नोटिसमध्ये अमेरिकेत दिलजित दोसांज यांच्या संगीत कार्यक्रमाचाही उल्लेख केला आहे. दिलजित दोसांज यांचा कार्यक्रम एफडब्ल्यूईसीकडूनच रद्द करण्यात आला होता.