बॉलिवूड कलाकारांकडून डॉक्टर, परिचारीका, सफाई कामगार, रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतूक; अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, यांच्यासह अनिल कपूर यांनीही अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे मानले आभार

कोरोना व्हायरच्या विरोधात जीवाचा धोका पत्करुन लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी मार्च रोजी जनतेला टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन केले होते. या आवाहनला जनतेनेकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.. रविवारी संध्याकाळी बरोबर 5 वाजता लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या वाजवल्या आहेत.दरम्यान बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांच्यासह अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अक्षय कुमारनेही (Akshay Kumar) ट्वीटरच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे कौतूक करत त्यांचे आभारही मानले आहेत. देशावर कोरोना व्हायरसचा संकट वावरत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांसाठी लढा देत असलेल्या कर्मचाऱ्यांवर संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाभरातल्या 130 कोटी नागरिकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. अत्यावश्यक सेवा वळगता सर्व कार्यलये दुकाने बाजारपेठा पूर्णपणे बंद झाल्या आहेत. बहुंताश ठिकाणी लोकांनी स्वताहून घराबाहेर पडणे टाळले आहे. दरम्यान, रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून तर, रात्री 9 वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली होती. या काळात मुंबईसह अनेक शहरांतील उपनगरी सेवा वगळता, एकही रेल्वेगाडी धावत नाही. दरम्यान, राज्यातील जनतेनेही पंतप्रधानांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला आहे. मुंबई, पुणे, नाशिक इथून नागरिकांनी आपापल्या सोसायट्यांमध्ये टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून तसेच पुण्यात काही ठिकाणी लोकांनी फटाके फोडून करोना योद्ध्यांचे आभार मानले आहेत. यात बॉलिवूड कलाकारांसह राजकीय नेते, खेळाडू यांचाही समावेश आहे. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात जमावबंदी लागू; आज रात्रीपासून राज्यातील एसटी, बस सेवा बंद; फक्त जीवनावश्यकच गोष्टी चालू

अमिताभ बच्चन यांचे ट्वीट-

अनिल कपूर यांचे ट्वीट-

अक्षय कुमार यांचे ट्वीट-

कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 3 लाखांना याची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच भारतात एकूण 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 300 हून अधिक लोकांचा या व्हायरसी लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.