सध्या सर्वत्र दक्षिण कोरियातील पॉप बँड ‘ब्लॅकपिंक’ (Blackpink)चीच चर्चा आहे. या बँडने यूट्यूबवरील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. चार मुलींचा हा बँड सर्वात कमी कालावधीत युट्युबवर सर्वाधिक व्ह्यूज मिळवणारा बँड ठरला आहे. या बँडचे ‘किल धीस लव्ह’ (Kill This Love) हे गाणे सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे, या गाण्याला युट्युबवर 13 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे कोरियाई आणि इंग्रजी भाषेत गायले आहे. या चार मुलींनी ‘गंगम स्टाईल’ गाण्याचा पॉप स्टार 'साई' चा रेकॉर्डही तोडला आहे.
4 एप्रिलला हे गाणे रिलीज करण्यात आले होते. या गाण्याला पहिल्या 24 तासांत साडेपाच कोटी व्ह्यूज मिळाले होते. आता या गाण्याच्या व्हिडीओने जगात सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या एरियाना ग्रांडेच्या थॅंक्यू गाण्यालाही मागे टाकले आहे. यूट्यूब वर बरेचवेळा अमेरिकन गाण्यांची चलती असते. अमेरिकन पॉप स्टारनीच आजपर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत, मात्र हा बँड आणि ‘किल धीस लव्ह’ हे गाणे याला अवपाद ठरले आहे. (हेही वाचा: Youtube वर व्हिडिओ ट्रेंड होण्यासाठी खास '4' टिप्स )
जिसू, जेनी, लिसा आणि रोझ या चौघींचा हा बँड आहे. या बँडने त्यांचा पहिला अल्बम 2016 मध्ये प्रदर्शित केला होता, ज्याला कोरियामध्ये बरीच लोकप्रियता मिळाली होती. नंतर त्यांचे 2018 मध्ये 'डू डू डू डू' हे गाणे आले होते, जे दक्षिण कोरियात सर्वात जास्त पहिले गेलेले गाणे ठरले.