Bigg Boss Marathi 2, 26th June 2019, Day 31 Episode Updates: टिश्यूमुळे हीना आणि परागमध्ये सुरु झालेल्या भांडणाने पार केली परिसीमा, नवीन कॅप्टनपदासाठी दिला गेला 'हा' टास्क
Bigg Boss Marathi 2, 26th June 2019 (Photo Credit : Colors Marathi)

Bigg Boss Marathi 2, Episode 32 Highlights: बिग बॉसच्या कालच्या भागात सदस्यांनी एकमेकांच्या पाप पुण्याचा हिशोब मांडला. या टास्क नंतर हीना, पराग, वीणा, किशोरी आणि रुपाली हे या आठवड्यासाठी असुरक्षित झाले आहेत. पुढे शिव सर्वांना तो वीणाच्या जाळ्यात अडकून कोणताही निर्णय घेणार नसल्याचे सांगतो. इथे पहिल्यांदाच शिवने त्याचा विचार ठाम मांडले आहेत. मात्र परत त्याला वीणाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतातच. शिवने हिनाला सुरक्षित केल्याचा राग वीणाच्या मनात आहेत, तो ती शिवसमोर बोलून दाखवते.

(इतके दिवस घरात राहिल्यानंतर, महेश मांजकरांकडून ओरडा खाल्ल्या नंतर आता कुठे तो थोडा व्यवस्थित खेळू लागला आहे.)

नॉमिनेशन टास्क पूर्ण झाल्यानंतर KVRP ग्रुप आता चांगलाच हादरला आहे. परागला तो घराबाहेर जाणार असल्याचे लक्षात आल्याने, तो हा ग्रुप परत एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान वीणाला तिच्या चुका समजून सांगताना दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही होते. (इथे वीणा प्रचंड बालिश असल्याचे जाणवते, तिला पराग काय म्हणत आहे समजताच नाही. त्यानंतर आता जाऊन ती चक्क नेहाचा बर्थडे सेलिब्रेशनमध्येही सहभागी होते.)

अखेर किशोरी आणि रुपाली वीणाला शिवशी जास्त संपर्कात राहू नको असे समजावून सांगतात. यावर वीणा विनाकारण ओक्साबोक्सी रडू लागते. इतक्यात नेहाच्या घरातून तिच्या केक येतो. वीणा एकटी रडत आहे हे पाहून तिला आपल्या ग्रुपमध्ये सामील करून घेण्यासाठी नेहा आणि वैशाली तिच्याशी गोड बोलणे सुरु करतात. दुसरीकडे पराग रूपालीला ती आपल्याला आवडत असल्याचे सांगतो, तसेच वेळ आल्यावर तो प्रपोज करणार असल्याचेही बोलून दाखवतो.

त्यानंतर KVRP ग्रुप बाथरूममधील टिश्यू बद्दल चर्चा करत असतो, तिथे हीना येऊन तिचे विचार मांडते. त्यानंतर वीणा आणि हीनाची जुंपते. त्यात परागही मध्ये पडतो आणि त्याला हीना उत्तरे देते. अखेर ही शाब्दिक चकमक वाढत जाऊन मोठे भांडण सुरु होते. या भांडणात घरातील सर्वजण सामील होऊन, एकमेकांवर कुरघोडी करणे सुरु होते.

त्यानंतर, घरातील पुढील कप्तानपदासाठी ‘टिकेल तो टिकेल’ हा टास्क दिला जातो. पहिल्या फेरीत शिव खुर्चीवर बसतो, तर रुपाली त्याची संरक्षक होते. टीम B मधील लोक त्याला खुर्चीवरून उठण्यासाठी प्रयत्न सुरु करतात. आता टीम B च्या प्रयत्नांनी शिव खुर्चीवरून उठेल का हे लवकरच कळेल.