भूषण प्रधान चं ऐतिहासिक भूमिकेसाठी मुंडण; वेब सीरिजच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला (Watch Video)
Bhushan Pradhan (Photo Credits: Instagram)

मराठी सिनेसृष्टीमध्ये हॉट अ‍ॅन्ड हॅन्डसम अभिनेत्यांपैकी एक भूषण प्रधान (Bhushan Pradhan) लवकरच ऐतिहासिक भूमिकांमधून रसिकांच्या भेटीला येणार आहे. मागील काही दिवसांपासून त्याने चाहत्यांना इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून संकेत दिले आहेत. त्याने केलेल्या पोस्टनुसार भूषण दामोदर चाफेकरांची (Damodar Chapekar) भूमिका साकरणार आहे. चाफेकरांच्या जन्मदिनी त्याने लिहलेल्या खास पोस्टमधून त्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र काल (27 जून) भूषणने दामोदर चाफेकरांच्या भूमिकेसाठी चक्क मुंडण केल्याचा व्हिडिओदेखील इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

भूषण प्रधानचा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

Getting in the look of........ (Watch till the end to know) @Zee5Premium #Zee5Originals

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on

 

View this post on Instagram

 

२५ जून आज तुमचा वाढदिवस... तुमची जयंती. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा जन्म चिंचवडचा आणि मी लहानाचा मोठा झालो तो चिंचवड येथेच. लहानपणी बाबांबरोबर स्कूटरवरून फिरताना न चुकता चौकात पोहोचल्यावर मान वर करून तुमच्या पुतळ्याकडे बघायचो. इतिहासाच्या पुस्तकात तुमच्या बद्दल एका धड्यात वाचताना सुद्धा खूप अभिमान वाटायचा. तेव्हा कल्पनाही नव्हती की मोठा झाल्यावर एक दिवस मला तुमची भूमिका साकारायला मिळेल. झी5 साठीची ही web series लवकरच प्रदर्शित होईल. चित्रिकरण अतिशय उत्तम आणि जोमाने सुरु आहे. आज भूमिकेसाठी म्हणून तुमचं आत्मवृत्त वाचताना, तुमच्या बद्दल अजून जाणून घेताना एकच लक्ष्यात येतंय की किती कमी माहित होतं मला तुमच्याबद्दल. तुमची भूमिका योग्यरित्या साकारता यावी म्हणून मी, आमचे निर्माते, दिग्दर्शक आणि अख्खी टीम मनापासून कष्ट घेत आहोत. तुमचे आशिर्वाद आमच्या पाठीशी असूद्यात. #Zee5Originals @Zee5Premium Coming soon!

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on

भूषण प्रधानची नवी वेबसीरीज Zee 5 साठी असेल. सध्या Zee 5 वर महाराष्ट्र संयुक्त चळवळीची कहाणी सांगणारी 'हुतात्मा' ही सीरीज सुरू आहे. यापूर्वी भूषण प्रधान ' कॉफी आणि बरंच काही..' , टाईमपास अशा सिनेमातून रसिकाच्या भेटीला आला आहे.