
1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यासोबतच 1960 दिवशी मुंबईसह महाराष्ट्र (Maharashtra) गुजरातपासून वेगळा झाला. 107 जणांच्या हौतात्म्यानंतर महाराष्ट्राला 'मराठी' भाषिकांचा प्रांत म्हणून स्वतःची ओळख मिळाली. आता संयुक्त महाराष्ट्राचा हा संघर्ष (Samyukta Maharashtra Movement) लवकरच 'हुतात्मा' (Hutatma) या वेबसीरीजच्या माध्यमातून रसिकांसमोर येणार आहे. जयप्रद देसाई (Jayprad Desai) यांनी या वेबसीरीजचे दिग्दर्शन केलं आहे.
झी फाईव्ह अॅपवर 1 मे 2019 पासून 'हुतात्मा' ही नवी वेबसीरीज पाहता येणार आहे. अभिनेता विक्रम गोखले, मोहन आगाशे, वैभव तत्ववादी, लोकेश गुप्ते, आनंद इंगळे, अभय महाजन यांच्यासह अश्विनी काळसेकर, अंजली पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 1960 साली मराठी लोकांनी एकत्र येऊन प्रांतवार रचना करताना भाषेच्या आधारावर राज्य बनवावे अशी मागणी केली होती.
हुतात्मा ही 'विद्युत' नावाच्या एका तरूणीची कथा आहे. विद्युतच्या वडिलांचं निधन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यानच्या लढ्यात होते. हुतात्मा सीरीजला संयुक्त महाराष्ट्र चळवळीची पार्श्वभूमी आहे.
हुतात्मा ट्रेलर
कुठे आणि कधी पहाल ?
हुतात्मा ही वेब सीरीज पाहण्यासाठी तुम्हांला गूगल प्ले स्टोअरमधून झी 5 अॅप डाऊनलोड करावे लागेल. तसेच ही सीरीज पाहण्यासाठी 'समर स्पेशल ऑफर'मध्ये दरमहा 71 रूपये आणि वार्षिक फी 699 रूपये द्यावे लागणार आहेत. बुधवार 1 मे पासून तुम्हांला ही वेबसीरीज पाहता येणार आहे.