बियोन्से (Photo Credits: Beyonce/instagram)

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी, यांची कन्या इशा अंबानी येत्या 10 डिसेंबरला उदयपुर येथे आनंद पिरामलशी लग्नबंधनामध्ये अडकत आहे. प्रियंका-निक, रणवीर-दीपिका यांच्याप्रमाणेच संपूर्ण जगाचे डोळे या लग्नाकडे लागले आहेत. नुकतेच याची एक झलक अंबानी कन्येच्या इटली येथे पार पडलेल्या साखरपुड्यात पाहायला मिळाली. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात इंडस्ट्रीमधील जवळजवळ सर्व मान्यवरांनी हजेरी लावली होती. पाण्यासारखा पैसा या साखरपुड्यावर खर्च झाला होता. हे पाहता लग्न किती धुमधडाक्यात होईल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. या होणाऱ्या लग्नाचे एजून एक महत्वाचे आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे, आंतरराष्ट्रीय गायिका-पॉपस्टार बियोन्से !

इशा आणि अनंद यांच्या साखरपुड्यात जॉन लीजेंड आणि ए आर रहमान यांनी परफॉर्म केले होते. विवाहसोहळा अजून अविस्मरणीय करण्यासाठी या पित्याने आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करत इतक्या मोठ्या स्टारला निमंत्रित केले आहे.

‘डीएनए'नं दिलेल्या वृत्तानुसार इशा ही बियोन्सेची फार मोठी चाहती आहे, यामुळेच अनिल अंबानींनी बियोन्सेला या विवाहप्रसंगी संगीत सेरेमनीदरम्यात परफॉर्म करण्यासाठी पाचारण केले आहे. या विवाहाच्या माध्यमातून पहिल्यांदाच बियोन्से एका भारतीय लग्नामध्ये परफॉर्म करणार आहे. बियोन्से सहसा प्रायव्हेट शोसाठी 2 मिलिअन डॉलर इतके मानधन घेते, यावरूनच या लग्नामध्ये परफॉर्म करण्यासाठी बियोन्से किती मानधन घेईल याचा अंदाज आपण लावू शकतो.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीनं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. ईशानं येलमधून यापूर्वी सायकोलॉजी आणि साऊथ एशियन स्टडीज पूर्ण केलीय. तर आनंद पीरामल हा व्यावसायिक अजय पीरामल यांचा मुलगा आहे. महाबळेश्वरच्या एका मंदिरात आनंदनं ईशाला प्रपोज केलं होते, त्यानंतर या प्रेमसंबंधाची परिणीती आता लग्नात होणार आहे.