Kesari Official Trailer: सत्य घटनेवर आधारीत अक्षय कुमारच्या महत्त्वकांक्षी 'केसरी'चा ट्रेलर प्रदर्शित
केसरी चित्रपटाचा ट्रेलर (Photo Credits: YouTube)

2019 मधील अक्षय कुमार (Akshay Kumar)चा बहुप्रतिक्षित आणि चर्चित चित्रपट म्हणजे केसरी (Kesari). सारागढी (Saragarhi) च्या युध्दावर आधारित या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आल्यापासून या चित्रपटाची चर्चा रंगली होती. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.  या चित्रपटामध्ये अक्षय ईशार सिंग (Dar Ishar Singh) नामक एका शीख योद्ध्याची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधून  या योध्याच्या पराक्रमाचे, वीरतेचे, देशभक्तीचे दर्शन घडते. ट्रेलरमध्ये असे अनेक शॉट्स आहेत त्यावरून चित्रपटासाठी अक्षय कुमारने घेतलेली मेहनतही दिसून येते.

या चित्रपटाचे कथानक सत्य घटनेवर आधारीत आहे.  122 वर्षांपूर्वी, 1897 साली 10 हजार अफगाण-पश्तो मिलिट्रीने 21 शिखांवर हल्ला केला होता. हार मानण्याऐवजी या शीख सैनिकांनी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आणि ही लढाई इतिहासात एक महान लढाई म्हणून प्रसिद्ध झाली. केसरी हा बहादुरीचा रंग आहे, शहीदीचा रंग आहे; म्हणूनच या हल्ल्यात शहीद झालेल्या शीख सैनिकांच्या प्रीत्यर्थ्य या चित्रपटाचे नाव 'केसरी' ठेवण्यात आले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले असून, करण जोहरने याची निर्मिती केली आहे. 21 मार्च रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.