'बाहुबली'ची आई शिवगामी देवी 'या' चित्रपटातून साकारणार XXX स्टारची भुमिका
रम्या कृष्णनन (Photo Credits- Still)

सर्वात लोकप्रिय ठरलेला 'बाहुबली' (Bahubali) आणि 'बाहुबली 2' (Bahubali 2) मधून झळकलेल्या सर्व कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. तसेच मुख्य भुमिका साकारलेल्या कलाकारांसह अन्य कलाकारांना ही या चित्रपटामधून प्रसिद्धी मिळाली आहे. कटप्पा आणि शिवगामी ही भुमिकासुद्धा प्रेक्षकांना फार आवडली होती. तर रम्या कृष्णनन (Ramya Krishnan) हिने बाहुबली चित्रपटात शिवगामी हिची भुमिका यशस्वीपणे पार पाडली होती. रम्या हिने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसह काम केले आहे. मात्र आता अशी चर्चा आहे की, रम्या तिच्या आगामी चित्रपटातून पॉर्न स्टारची भुमिका साकारणार आहे.

'सुपर डिलक्स' (Super Deluxe) असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात रम्या एका पॉर्न स्टारच्या रुपात दिसणार आहे. त्यागराजन कुमारराज या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर लिला नावच्या पॉर्न स्टारची भुमिका रम्या साकारणार आहे. लिला नावाची भुमिका साकारत असताना तिला 37 वेळा टेक्स घ्यावे लागले होते. त्याचसोबत ही भुमिका माझ्या करियर मधील कठीण असल्याचे रम्या हिने म्हटले आहे.

पाहा सुपर डिलक्स चित्रपटाचा ट्रेलर:

या चित्रपटातून रम्या हिच्यासह विजय सेथुपथी. समांथा, फहाद फासिल आणि मास्किन असे कलाकार मुख्य भुमिकेतून दिसणार आहेत. सुपर डिलक्स हा चित्रपट येत्या 29 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.