Baaghi 3 Box Office Collection: टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्या 'बागी 3' सिनेमाची चौथ्या दिवशी 9 कोटी रुपयांची कमाई
Tiger Shroff Baaghi 3 (PC - Instagram)

Baaghi 3 Box Office Collection: टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या बागी 3 (Baaghi 3) सिनेमाने सलग चौथ्या दिवशी 62 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. मागील आठवड्यात म्हणजेच 6 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने तीन दिवसांत 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमी असतानाही 'बागी 3' सिनेमाला मोठं यश मिळालं आहे. या अॅक्शन चित्रपटाने पहिल्या दिवशी 17.50 कोटींची कमाई केली. तसेच दुसऱ्या दिवशी 16.03 कोटींची कमाई केली. त्यानंतर चौथ्या दिवशी 62 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी बागी 3 चित्रपटाचा चौथ्या दिवसाचा बिजनेस आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. (हेही वाचा - Holi 2020: प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांनी होळी पार्टीत घेतला भांगेचा आस्वाद; पहा Viral Video)

टायगर श्रॉफच्या जबरदस्त अॅक्शनमुळे या चित्रपटाने सिंगल स्क्रिन तसेच मेट्रो सिटीमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे. मात्र, कोरोना व्हायरस, पायरसी आदी समस्यांमुळे बागी 3 चित्रपट काही प्रमाणात अडचणीत सापडला आहे. सध्या होळी सणामुळे 'बागी 3' सिनेमावरही परिणाम होताना दिसत आहे. टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरच्या यांचा बागी 3 सिनेमा संपूर्ण जगभरात 5500 स्क्रिनवर रिलीज झाला आहे. तसेच भारतात 4400 स्क्रिनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.