देशात एखादी मोठी घटना घडली की त्यासोबतच स्वयंघोषित विश्लेषक राखी सावंत (Rakhi Sawant) हिचे व्हिडीओ हे लगेचच चर्चेत येतात. सद्य घडीला महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) मध्ये होता असणाऱ्या नाट्यमय घडमोडी देखील याला अपवाद नाहीत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वेळीच माझा सल्ला ऐकला असता तर ते आज मुख्यमंत्री असते असे म्हणत राखीने नुकताच एका नवा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. नरेंद्र मोदींची (Narendra Modi) ताकद मला माहीतच होती, आणि त्यांच्यामागे मास्टरमाइंड अमित शहा (Amit Shaha) यांचा हात आहे, अशावेळी उद्धव ठाकरे यांनी वाद घालण्याची गरज नव्हती. आता अमित शाह आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकमेकांना साथ देत उद्धव यांना खुर्चीपासून लांब ठेवलंय असाही दावा राखीने केला आहे.
राखीने आपल्या व्हिडीओ मध्ये नेहमीप्रमाणे मोठमोठ्या बाता केल्या आहेत. “मी उद्धव ठाकरे व शरद पवार यांना सांगितले होते एकमेकांविरोधात भांडू नका, आणि लवकरात लवकर सरकार स्थापन करा. परंतु त्यांनी माझे ऐकले नाही. आता बघा, अमित शाह यांनी शरद पवार यांना फोन करुन उद्धव यांच्याकडे काही मिळणार नसल्यासाचे सांगत बरोबर आपल्या बाजूने वळवून घेतलं आहे" असे म्हणताना राखी सावंत हिने आपल्याला उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदी बसावे अशी इच्छा होती मात्र आता त्याचा मार्गच संपला आहे असेही सांगितले.
पहा काय म्हणतेय राखी सावंत
दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत भाजपने मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांना बसवून सोबतच अजित पवार यांच्या रूपात राष्ट्रवादी काँग्रेस सोबत देखील हातमिळवणी केल्याची चिन्हे आहेत. अद्याप भाजपाला बहुमत सिद्ध करता आलेले नाही. याकरिता विधानसभेत जेव्हा विश्वासदर्शक ठराव घेतला जाईल तेव्हाच सर्व पक्षांची ठोस भूमिका समोर येईल.