Amavas Trailer : भय, रोमान्स आणि ड्रामा यांचे मिश्रण असलेला 'अमावस'चा ट्रेलर
अमावस ट्रेलर (Photo credit: Viiking Official)

Amavas Trailer : '1920 एव्हिल रिटर्नस', 'रागिणी एमएमएस 2' आणि 'अलोन' यांसारखे भयपट दिग्दर्शित करणारे भूषण पटेल अजून एक हॉरर चित्रपट घेऊन येत आहेत. ‘अमावस’ असे या चित्रपटाचे नाव असून, नावाप्रमाणेच अमावसेच्या रात्री घडणाऱ्या घटना या चित्रपटामध्ये पाहायला मिळतील. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दोघे सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर जातात, तिथे गेल्यावर घरात आधीच वास असलेल्या अतृप्त आत्म्याकडून ज्या गोष्टी भोगाव्या लागतात त्या या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात नर्गिस फाखरी आणि सचिन जोशी मुख्य भूमिकेत आहेत.

भूषण पटेलच्या आधीच्या हॉरर चित्रपटांपेक्षा हा चित्रपट थोडा हटके आहे. भय, रोमान्स आणि ड्रामा अशा तीनही गोष्टींचे मिश्रण असणारा हा चित्रपट, तांत्रिक दृष्ट्याही खूप सरस वाटतो. ‘रॉकस्टार' सारख्या एका आशयघन चित्रपटामधून करिअरची सुरुवात करणारी नर्गिस अमावसमध्ये खूपच बोल्ड दिसली आहे. मोना सिंगदेखील या चित्रपटामध्ये एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 11 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.