![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/2-557088309-2-380x214.avif?width=380&height=214)
Alia Bhatt Workout Video: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. आलिया भट्ट फिटनेस फ्रीक आहे. अनेकदा आलिया भट्ट जिमच्या बाहेर स्पॉट झाली आहे. दरम्यान, आलिया नेहमीच तिचे व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर करत असते. नुकताच आलियाने एक इंटेन्स वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. 'संघर्ष महत्त्वाचा आहे', असे कॅप्शन मध्ये लिहिले आहे. अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी टाकले. एका चाहत्याने लिहिलं, 'आता फिटनेसकडे लक्ष द्यावे लागेल.' आणखी एकाने लिहिले, 'सर्वात मेहनती अभिनेत्री'. ती अनेकदा जिमच्या बाहेर स्पॉट होते आणि तिचे वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना फिट राहण्याची प्रेरणा देते. तिने एक नवीन वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे . आलियाने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करत की, "संघर्ष आवश्यक आहे.
येथे पाहा, आलिया भट्टचा वर्कआउट व्हिडिओ:
View this post on Instagram
आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यात रणबीर कपूर आणि विकी कौशल देखील दिसणार आहेत. अलीकडेच एका मुलाखतीत विकी कौशलने आलिया आणि रणबीरसोबतच्या आपल्या बॉन्डिंगबद्दल सांगितले. विक्की म्हणाला, 'मी आलियासोबत 'राझी' केला होता. ती उत्तम कलाकार असून त्यांच्यासोबत काम करणे सोपे जाते. वेदांग रैनासोबत 'जिगरा' चित्रपटात झळकलेल्या आलिया भट्टने लव्ह वॉर व्यतिरिक्त कोणत्याही नव्या प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.