खिलाडी कुमार (Khiladi Kumar) आपल्या सिनेमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक विषयांना हात घालताना दिसतो. टॉयलेट एक प्रेम कथा (Toilet Ek Prem Katha), पॅडमॅन (Padman), ओ माय गॉड (Oh My God) सारखे विविध सिनेमांना अक्षयच्या फॅन्सने जोरदार पसंती दिली. असही वर्षात सर्वाधिक सिनेमा करणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) एकमेव बॉलिवुड (Bollywood) अभिनेता आहे.  पण आता अक्षय कुमारने रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Red International Film Festival) एक मोठी घोषणा केली आहे. अक्षय कुमार लैगिक शिक्षणासारख्या (Sex Education) गंभीर विषयावर सिनेमा बनवण्याच्या विचारात आहे, असं खुद्द अक्षय कुमार यांनी सांगितलं. भारतात लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे विविध अंधश्रध्दा, गुन्हे किंवा विविध समस्या निर्माण होताना दिसतात. लाजेपोटी कुणीही या विषयांवर मोकळेपणाणे बोलताना दिसत नाही. पण आता खिलाडी कुमार थेट या नाजुक विषयाला हात घालत अक्षय कुमार मोठ्या पडद्यावरचं लैगिक शिक्षण देणार आहेत.

 

रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या  (Red International Film Festival) मंचावर अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणाला "लैंगिक शिक्षण हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. पण तरीदेखील या विषयाची दखल घेतली जात नाही. जगातील प्रत्येक शाळेत हा विषय शिकवला गेला पाहिजे असं मला वाटतं. पण मी माझ्यापद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त हा सिनेमा प्रदर्शित व्हायला थोडा वेळ लागेल. पण हा माझ्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी एक सर्वोत्कृ्ष्ट सिनेमा असेल. (हे ही वाचा:- Salman Khan ची एक्स गर्लफ्रेंड Somy Ali ने अभिनेत्यावर केले गंभीर आरोप; म्हणाली, 'सिगारेटने चटके देऊन वर्षानुवर्षे केली मारहाण)

 

तरी अक्षय कुमारच्या या घोषणेनंतर अक्षयचे फॅन्स या सिनेमासाठी मोठे उत्सुक आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वीच अक्षयचा कटपूतली हा सिनेमा हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता. ओटीटीवर या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तरी नुकताचं अभिनेता आयुष्मान खुरानाचा सिनेमा अक्शन हिरो मध्ये देखील अक्षयची झलक बघायला मिळाली. तरी अक्षयच्या नव्याने प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाची अनेकांना प्रतिक्षा आहे.