Salman Khan ची एक्स गर्लफ्रेंड Somy Ali ने अभिनेत्यावर केले गंभीर आरोप; म्हणाली, 'सिगारेटने चटके देऊन वर्षानुवर्षे केली मारहाण'
Somy Ali, Salman Khan (PC- Wikimedia Commons, Facebook)

Somy Ali  Allegations Against Salman Khan: एकेकाळी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) ने तिच्या ताज्या पोस्टमध्ये सलमान खान (Salman Khan)वर गंभीर आरोप केले आहेत. सोमी अलीने पोस्टमध्ये कुठेही सलमानचे नाव घेतलेले नाही, परंतु तिने लिहिलेल्या पोस्टमध्ये तिने सलमानसोबतचा तिचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेता तिला फुले देत आहे. नंतर सोमी अलीनेही ही पोस्ट डिलीट केली. सोमी अलीने सलमानवर आरोप केला आहे की, या अभिनेत्याने केवळ तिचा भारतातील शोच बंद केला नाही तर तिला खटल्याची धमकीही दिली. सोमीने नाव न घेता सलमानवर तिला सिगारेटने जाळल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोपही केला आहे.

सोमी अलीच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सोमी अली पाकिस्तानात राहत होती. पण नंतर ती मुंबईत आली. येथे आल्यानंतर सोमी अलीने सलमानसोबत एक चित्रपटही केला आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. सोमी अली आणि सलमानचे अफेअर 1991 मध्ये सुरू झाले जे 1998 पर्यंत चालले आणि त्यानंतर 8 वर्षांनी त्यांचा ब्रेकअप झाला. (हेही वाचा -1998 Blackbuck Poaching Case: राजस्थान उच्च न्यायालयाने अभिनेता Salman Khan च्या हस्तांतरण याचिकेला दिली परवानगी)

सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी अली पुन्हा फ्लोरिडाला गेली आणि तिची एनजीओ चालवू लागली. पण सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर सोमी अली पुढे जाऊ शकली नाही असे दिसते. तिने अनेकदा सलमानला लक्ष्य केलं आहे. काही काळापूर्वी तिने एक पोस्ट शेअर करून सलमानवर मारहाणीचा आरोप केला होता. त्या पोस्टमध्ये सोमीने कुठेही सलमानच्या नावाचा उल्लेख केला नाही, पण त्याच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटातील छायाचित्र तिने शेअर केले होते.

आता सोमीने पुन्हा एकदा अभिनेत्यावर गंभीर आरोप केला आहे. सलमानसोबतचा एक जुना फोटो शेअर करत तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले आहे की, 'आता अजून काय बाकी आहे. माझ्या शोवर भारतात बंदी आणली आणि नंतर मला खटला भरण्याची धमकी दिली. तू भित्रा आहेस तुमच्या वकिलाला काढून टाक. माझ्या संरक्षणासाठी माझ्याकडे 50 वकील आहेत. तु अनेक वर्षापासून माझे शारीरिक शोषण केले आणि मला सिगारेटचे चटके दिले.'

या पोस्टमध्ये सोमी अलीने काही अपशब्दही वापरले आहेत. यासोबतच त्या अभिनेत्रींनाही टार्गेट करण्यात आले आहे, ज्या सलमानला सपोर्ट करत आहेत. महिलांना मारहाण करणाऱ्या पुरुषाचे समर्थन करणाऱ्या अभिनेत्रींना लाज वाटते का? त्या माणसाला सपोर्ट करणाऱ्या पुरुष कलाकारांनाही लाज वाटते का? आता लढण्याची वेळ आली आहे. (हेही वाचा - Salman Khan Threat Letter Case: सलमान खान, सलिम खान यांना धमकावण्याच्या प्रकरणामागील Bishnoi Gang च्या हेतूबद्दल पोलिसांचा खुलासा; पहा काय होतं कारण!)

दरम्यान, सोमी अलीने नंतर तिची ही पोस्ट डिलीट केली, परंतु ती अजूनही सोशल मीडियावर दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सोमी अली एकेकाळी स्वत:ला सलमान खानची मोठी फॅन म्हणवत होती आणि आज ती त्याच्यावर टीका करत आहे, दुसऱ्या एका मुलाखतीत सोमी अलीने सलमानसोबतच्या ब्रेकअपचे कारणही सांगितले होते आणि अभिनेत्याने तिची फसवणूक केल्याचे सांगितले होते. आता सोमी अली आणि सलमानचा हा वाद कुठपर्यंत पोहोचतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.