Sarfira Trailer: अक्षय कुमार स्टारर 'सरफिरा'चा ट्रेलर आऊट, 12 जुलैला सिनेमागृहात होणार रिलीज
Photo Credit-x

Sarfira Trailer: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट 'सरफिरा'चा ट्रेलर आऊट झाला आहे. अभिनेता अक्षय कुमार याने स्व:ता याबाबतची माहिती दिली. 12 जुलै रोजी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शीत होणार असल्याचे त्याने म्हटले. अक्षय कुमारने त्याच्या एक्स अकाऊंवर पोस्ट शेअर करून सरफिरा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्याची माहिती दिली. अक्षयने पोस्टला 'पहले स्वप्नांच्या दिशेने...#सरफिराचा ट्रेलर आऊट! 12 जुलै रोजी पहा सरफिरा, फक्त सिनेमागृहात', असे कॅप्शन दिले. (हेही वाचा: Sarfira: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'सरफिरा' चित्रपटाचा पोस्टर लॉंच, 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला)

'सरफिरा' मध्ये ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, राधिका मदान आणि सीमा बिस्वास अशा उत्कृष्ट कलाकारांची टीम आहे. अरुणा भाटिया, ज्योतिका, सुरिया आणि विक्रम मल्होत्रा ​​यांचा समावेश असलेल्या पॉवरहाऊस टीमने चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकताच अक्षर कुमारचा बडे मिया छोटे मिया चित्रपट रीलिज झाला होता. चित्रपटाने बॉक्य ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपटाने 100 कोटींच्या जवळपास कमाई केली. दरम्यान चित्रपटाची कथानक शालिनी उष्मादेवी पूजा तोलानी यांनी लिहिले आहे.

अक्षय कुमारच्या पुढच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर, हाऊयसफुल 5, राउडी राठौड 2, सायको, हेरा फेरी 3, 'जॉली एलएलबी 3 अश्या अनेक चित्रपटात तो महत्त्वाची भुमिका बजावणार आहे.