PC-Instagram

Cannes Film Festival: जगभरातील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी 78 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 (Cannes Film Festival) मध्ये आपली उपस्थिती नोंदवली आहे. आजूनही काही आपली हजेरी लावत आहेत. भारताकडून आतापर्यंत, जॅकलिन फर्नांडिस, उर्वशी रौतेला, जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर सारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि भारतीय प्रभावशाली कलाकारांनी कान्स 2025 मध्ये त्यांच्या लूकने चाहत्यांना प्रभावित केले आहे. पण आता अखेर ज्या व्यक्तीची सर्व आतुरतेने वाट पाहत होते ती सौंदर्यवती कान्सच्या रेड कार्पेटवर आपले आकर्षण पसरवताना दिसणार आहे. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी फ्रान्समध्ये पोहचली आहे. तेथे ऐश्वर्याच स्वागत करण्यात आले. यावेळी लेक आराध्याही तेथे उपस्थित होती.

Actress Ruchi Gujjar ने Cannes 2025 मध्ये घातला PM Narendra Modi चा फोटो असलेला नेकलेस (See Pic)

ऐश्वर्या आराध्यासोबत कान्समध्ये सहभागी

78 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्या बच्चनसोबत फ्रान्सला पोहोचली आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती फ्रान्समधील नाइस विमानतळावर असल्याचे दिसत आहे. ऐश्वर्या राय फेन या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे ऐश्वर्या राय हसतमुख संवाद करताना दिसत आहे.

2002 मध्ये पदार्पण

ऐश्वर्या लॉरियल पॅरिसची जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून रेड कार्पेटवर चालताना उद्या 22 मे रोजी दिसणार आहे. रेड कार्पेटवर तिचा हा 22 वा वॉक असेल. 2002 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'देवदास' या चित्रपटाचा प्रीमियर झाला तेव्हा ऐश्वर्याने रेड कार्पेटवर पदार्पण केले. यावेळी ती रथावर स्वार होऊन कान्समध्ये पोहोचली आणि यावेळी शाहरुख खान आणि चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली देखील उपस्थित होते.