Ketaki Chitale (Photo Credits: Instagram)

दिल्ली हिंसाचार (Delhi Violence) मुद्द्यानंतर सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या पोस्टवर बंधने लावण्यात यावीत, धार्मिक, जातीय विधाने करताना नेट युजर्सनी सतर्क राहावे असे आवाहन पोलीस व सरकारतर्फे वारंवार करण्यात येत असते, मात्र कित्येकदा आपले मत मांडण्याचा प्रयत्न करत असताना या सूचना लक्षात घेतल्या जात नाहीत, असेच काहीसे घडले आहे अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्याबाबतीत. केतकीने आपल्या फेसबुकवर एका पोस्ट मध्ये सर्व धर्मांना टार्गेट करणारी विधाने लिहिली आहेत, मात्र यामधील नवबौद्धांवर करण्यात आलेल्या विधानावरून आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) म्हणजेच रिपाई च्या मुंबई प्रदेशाध्यक्ष राजू थाटे (Raju Thate)  यांच्याकडून थेट पोलिसात धाव घेतण्यात आल्याचे समजतेय. मुंबईतील भांडुप पोलीस ठाण्यात थाटे यांच्यातर्फे लिखित तक्रार नोंदवण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्यावर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले शिवसेना विरोधात वक्तव्य केल्याने राजकीय षडयंत्र

केतकीने पोस्ट मध्ये काय लिहिलं?

1 मार्च रोजी केतकीने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती.यात पारसी, जैन, शीख, मुस्लिम अशा सर्व धर्मांना सूट दिली जाते, मात्र हिंदूंनी धर्मपालन केले की त्यांना नाव ठेवली जातात या आशयाची विधाने आहेत. यात “नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” असं तिनं नमूद केलं होतं. याशिवाय, मी सर्वप्रथम एक भारतीय आहे,मी हिंदू विचारसरणीचे पालन करते. मला कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा द्वेष नाही, पण धर्म आणि जातीच्या आधारावर वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तिंचा द्वेष नक्कीच आहे.असेही केतकीने स्पष्ट केले होते.

पहा केतकी चितळे हिची फेसबुक पोस्ट

दरम्यान या प्रकरणी तक्रार करत असताना, "महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी 6  डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नसून ते मुंबई दर्शनासाठी येतात, या त्यांच्या वक्तव्यावरून हा समाज फुकटा आहे आणि त्या महामानवाचा आदर करत नाहीत हे स्पष्ट होत आहे,” थाटे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. “यातून त्यांचा नवबौद्ध समाजाबाबतचा द्वेष पसरवला जातोय, असे म्हणत राजू थाटे यांनी केतकीवर अॅट्रोसिटी दाखल करण्याची मागणी केलीआहे.