सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) लाल कप्तानचा  (Laal Kaptaan) ट्रेलर पाहून आमिर खान (Aamir Khan) भलताच प्रभावित झाला आहे. नुकताच त्याने ट्विटर अकाउंट वरून तो व्हिडिओ शेयर सुद्धा केला आहे. आमिर खानने या चित्रपटाचे कौतुक भरपूर कौतुक केले आहे.

आमिर म्हणतो, 'मंडळी, चित्रपटाचा ट्रेलर खूपच भारी आहे, नक्की बघा.'

18ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या, नवदीप सिंग दिग्दर्शित लाल कप्तान  मधल्या सैफ अली खानच्या लुकची सध्या बरीच चर्चा होत आहे. साधूसारखा वेष असलेला सैफचा हा चित्रपट एक 'रिव्हेंज ड्रामा असावा,' असे ट्रेलर वरून वाटत आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडावर बेतलेला ह्या चित्रपटात, सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha) दीपक डोब्रियाल आणि झोया हुसेन हे कलाकार सहायक भूमिकेत आहेत. तर मानव वीज ने खलनायकाची भूमिका केली आहे.

 

सैफ अली खानने त्याच्या करिअरच्या ह्या टप्प्यावर, गेल्या काही वर्षांत स्वीकारलेल्या विविधांगी भूमिकेंच्या यादीतली ही अजून एक भूमिका असं म्हणायला हरकत नाही. रंगून, बाजार  या चित्रपटात केलेल्या खलनायकी भूमिका, तर सेक्रेड गेम्स  मध्ये केलेला सरताज सिंग, या विभिन्न भूमिका त्याने चांगल्या वठवल्या. तसेच पुढच्या वर्षी येणाऱ्या तानाजी  चित्रपटातही तो उदयभानाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे आपल्या कामाची 'रेंज' वाढवण्याचा त्याने केलेला हा काळजीपूर्वक प्रयत्न, सफल होण्यासाठी लाल कप्तानने  तिकीटबारीवर यश मिळवणं फार गरजेचं आहे, असंही म्हणता येईल.