आमिरची लेक इरा खान हॉटनेसच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना टाकतेय मागे; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Ira Khan Hot Shoot (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचे (Bollywood)  स्टार किड्स आणि त्यांची जीवनशैली हा आजवर नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. मग तो करीना आणि सैफचा छोटा नवाब तैमूर असो, शाहिदची कन्या मिशा असो श्रीदेवीची जान्हवी, शाहरुखची सुहाना हे स्टार किड्स नेहमीच मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या नजरेसमोर असतात. काही वेळा त्यांचे हटके काम, तर अनेकदा फक्त लूक देखील त्यांचे वेगळेपण दाखवून जातो. असाच काहीसा प्रकार बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याच्या लेकीसोबत म्हणजेच इरा खान (Ira Khan) सोबत झाला आहे. इरा ही वास्तविक बॉलिवूड मध्ये किंवा कोणत्याही छोट्या मोठ्या पडद्यावर काम करताना दिसून आलेली नाही, इतकेच नव्हे तर मोठमोठे अवॉर्ड शो , पार्ट्या यामध्ये देखील ती कधी स्पॉट झालेली नाही, पण असं असलं तरी सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच इराने आपले काही बोल्ड फोटो पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे फोटो म्हणजे भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देणारे आहेत.

इराने यापूर्वी Who Are You? नावाखाली आपल्या फोटोची एक सीरिज शेअर केली होती. या सीरिजमधील फोटोमध्ये सुद्धा इराचा तितकाच होत आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. इरा खान चा हॉट अंदाज

इरा खान आपला बॉयफ्रेंड मिशाल कृपलानी यांच्यासोबतच्या रिलेशनशीपमुळे देखील अनेकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी इराने तिच्या इन्टा स्टोरीतून मिशाल याला डेट करत असल्याचा खुलासा केला होता.

दरम्यान, इराने आपल्या करिअरची सुरुवात एका दिग्दर्शक म्हणून केली आहे, 'Euripides Medea' या नाटकाच्या रूपातून भारत व परदेशात तिचे काम पाहायला मिळणार आहे.