आकाश अंबानी-श्लोका मेहता यांच्या संगीत कार्यक्रमावेळी आमिर खान थिरकला, पाहा व्हिडिओ
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता (Photo Credits: Instagram)

आकाश अंबानी (Akash Ambani) आणि श्लोका मेहता (Shloka Mehta) यांच्या शानदार अशा प्री-व्हेडिंगचे (pre-wedding ceremony)  आयोजन स्विर्त्झलँड (Switzerland) येथे ठेवण्यात आले आहे. या सोहळ्याला बॉलिवूड मधील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली. तर करण जोहर,शाहरुख खान आणि आमिर खान सह अन्य बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.

अंबानी परिवाराने या सोहळ्याचे आयोजन स्विर्त्झलँड येथील मोरित्ज येथे केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या सोहळ्याचे व्हिडिओ आणि फोटो खुप व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

@_aamirkhan dancing on the tunes of #AyeKyaBoltiTu with bride-to-be #ShlokaMehta is unmissable!

A post shared by BollywoodLife (@ibollywoodlife) on

या संगीत सोहळ्यावेळी बॉलिवूड कलाकार थिरकताना दिसून आले. तसेच अंबानी परिवाराकडून जोरदार या सोहळ्याची तयारी केलेली पाहायला मिळाली.

 

View this post on Instagram

 

#aamirkhan takes #shlokamehta side at #akashambani #shlokamehta fairytale pre wedding bash ❤️❤️❤️ @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

मेहता परिवारासोबत अमिर खान थिरकताना दिसून आला.त्यावेळी श्लोका मेहता हिच्यासोबत आमिरने त्याच्या चित्रपटातील 'आती क्या खंडाला' या गाण्यावर डान्स करताना दिसला.

दरम्यान आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांची ग्रँड वेडिंग सेरेमनी मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील वर्ल्ड सेंटर येथे ठेवण्यात आली होती. अंबानी परिवार 10 मार्च रोजी मंगल पर्वाचे आयोजन करणार असून 11 मार्च रोजी रिसेप्शन पार्टी ठेवणार आहे.