भारताची गानकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी 28 सप्टेंबर रोजी आपला 90 वा वाढदिवस साजरा केला आहे. या निमित्ताने संपूर्ण देशाभरातून लता मंगेशकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये कलाकार, रायकीय नेता तसेच चाहत्यांचाही समावेश आहे. परंतु लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानंतर त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी इंस्टाग्रामवर (Instagram) खाते सुरु केल्यामुळे याचीच अधिक चर्चा होत आहे. लता मंगेशकर यांनी त्यांच्या पहिल्या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामुळे अवघ्या २ तासात लता मंगेशकर यांना 47 हजाराहून अधिक युजर्सने फॉलो केले आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी बहीण मीना यांच्यासह फोटो शेअर केला आहे.
इस्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून भारतात याची सुरुवात 20 सप्टेंबर 2017 मध्ये झाली होती. त्यानंतर अनेक लोकांनी इंस्टाग्रामला पसंती दाखवली आहे. परंतु लता मंगेशकर यांनी त्यांच्या वयाच्या 90 व्या वर्षी इंस्टाग्रामवर खाते उघडल्यामुळे सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. भारतात इंस्टाग्राम सुरु होऊन अनेक दिवस उलटली, तरीदेखील लता मंगेशकर यांचे इंस्टाग्रामवर खाते नव्हते? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. लता मंगेशकर यांनी रविवारी इस्टाग्रामवर खाते उघडून त्यांच्या पहिल्या पोस्टमध्ये वडिलांच्या अल्बमसह एक फोटो काढून शेअर केला आहे. यानंतर अवघ्या 2 तासात लता मंगेशकर यांना 47 हजाराहून अधिक युजर्सने फॉलो केले आहे. हे देखील वाचा- लता मंगेशकर यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडूलकर याने व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या खास शुभेच्छा (Watch Video)
लता मंगेशकर यांनी केलेली पोस्ट-
लता मंगेशकर यांची इंस्टाग्रामवरील दुसरी पोस्ट-
नमस्कार, आज मी पहिल्यांदाच तुमच्याबरोबर इन्स्टाग्रामवर सामील होत आहे, असे लता मंगेशकर यांनी पहिल्या पोस्टमध्ये लिहले आहे. दुसर्या पोस्टमध्ये त्यांनी बहीण मीना यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या पहिल्या प्रतीसह स्वत: चे आणि उषाचे चित्र पोस्ट केले आहे. लता मंगेशकर ट्विटरवर बर्याच दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहेत. त्या दररोज ट्विट करत राहते. यात संगीत, इतिहास आणि क्रिकेटशी संबंधित पोस्टचा समावेश आहे.