56 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव (संग्रहित-संपादित प्रतिमा)

लवकरच 56 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव (56th Maharashtra State Film Awards) साजरा होईल. नुकतेच याच्या प्राथमिक फेरीमधील तीन नामांकनांची शिफारस तसेच सात तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके जाहीर झाली. उत्कृष्ट बालकलाकारासाठी श्रीनिवास पोकळे (नाळ) आणि अमन कांबळे (तेंडल्या) यांना पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या काळात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 66 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका या महोत्सवासाठी आल्या आहेत.

घोषित झालेली पारितोषिके -

> उत्कृष्ट कला दिग्दर्शन- नरेंद्र हळदणकर (बंदिशाळा)

> उत्कृष्ट छायालेखन- सुधीर पळसाने (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर)

> उत्कृष्ट संकलन- नचिकेत वाईकर (तेंडल्या)

(हेही वाचा: 'अश्रुंची झाली फुले' नाटक पुन्हा रंगमंचावर; सुबोध भावे साकारणार 'लाल्या'ची भूमिका? (Video))

> उत्कृष्ट ध्वनिमुद्रण- गंधार मोकाशी (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर)

> उत्कृष्ट ध्वनी संयोजन- मंदार कमलापूरकर (पुष्पक विमान)

> उत्कृष्ट वेशभूषा- चैत्राली गुप्ते (एक सांगायचंय अनसेड हार्मोनी)

> उत्कृष्ट रंगभूषा- विक्रम गायकवाड (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर)

अंतिम फेरीसाठी, उत्कृष्ट चित्रपट या श्रेणीमध्ये दिठी, भोंगा आणि डॉ. काशीनाथ घाणेकर, फायरब्रँड, बंदिशाळा, आम्ही दोघी, एक सांगायचंय, अनसेड हार्मोनी, तेंडल्या, भूर्जी, चुंबक या दहा चित्रपटांना नामांकन प्राप्त झाले आहे. हे सर्व पुरस्कार 26 मे 2019 रोजी प्रदान करण्यात येणार आहेत. रु.50,000  व मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप असणार आहे.