Yamaha MT-15 (Photo Credits-Facebook)

Yamaha कंपनीची Yamaha MT-15 बाईक भारतात लॉन्च केली आहे. या बाईकसाठी भारतीय किंमत 1.36 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. भारतात बहुप्रतिक्षित बाईकमधील यामाहा कंपनीची ही सुपर बाईक असल्याचे म्हटले जात आहे. तर आजपासून बुद्ध इंटरनॅशनल सर्किटमध्ये लॉन्च केले आहे.

इंडोनेशिया मध्ये विकण्यात येणारी MT-15 च्या तुलनेत इंडिया स्पेक मॉडेलमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बाईकमधील बदल खासकरुन फीचर्स आणि इक्विपमेंट लिस्टमध्ये करण्यात आला आहे. यामाहाच्या या बाईकचे लूक ग्लोबल MT रेंजसारखे मिळते जुळते आहे. या बाईकसाठी दोन रंग देण्यात आले असून त्यात डार्क मॅट ब्लू आणि मॅटेलिक ब्लॅक मध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये USD फोर्क्सच्या जागी स्टॅंडर्ड ट्विन फोर्क्स देण्यात आले आहे. बाईकच्या रियरमध्ये मोनोशॉक सस्पेंशन दिले आहे. तर पुढील बाजूस 282mm फ्रंड डिस्क ब्रेक सिंगल चॅनल ABS युनिटसह देण्यात आले आहे.(हेही वाचा-Yamaha Fascino चे नवे मॉडेल लॉन्च, किंमत 60 हजार रुपयांपेक्षा कमी)

मॅकनिकल स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर, यामाहा एमटी-15 मध्ये वॅरिएबल वॉल्व एक्चुएशन सिस्टम आणि स्लिपर क्लचसह 155cc लिक्विड कूल्ड SOHC इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 19bhp पॉवर आणि 14.7Nm पिक टॉर्क जनरेट करु शकणार आहे. या इंजिनसह ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड गियरबॉक्स दिले आहे. किंमत आणि परफॉर्मेंस बद्दल यामाहा एमटी-15 हा बाईक VS Apache RTR 200 4V आणि KTM 125 Duke ला टक्कर देणारी आहे.